S R Dalvi (I) Foundation

पालकांनी मुलांसाठी किमानपक्षी काय करावे? का?

What is the minimum parents should do for their child? why

प्रिय सुजाण पालकहो, तुमच्या इच्छा-आकांक्षा, आशा-अपेक्षांचे ओझे तुमच्या पाल्यावर कधीच लादू नका. त्याची/तिची बौद्धिक कुवत, कल, विचारसरणी, सक्षमता आदी बाबींचा विचार करून तुमच्या पाल्याला निर्णय घेऊ द्या. मात्र या निर्णय प्रक्रियेत तुम्ही जाणीवपूर्वक सहभागी व्हा. ‘तू डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायला पाहिजे’ असा दबाद पाल्यावर आणू नका, तुम्हाला काय वाटते? यापेक्षा तुमच्या पाल्याला काय बनायचे आहे? कोणत्या क्षेत्रात भवितव्य घडवायचे आहे हे जाणून घ्या. स्वतःच्या इच्छा-आकांक्षेला मुरड घालून त्याला/तिला आवडीच्या क्षेत्रानुसार प्रोत्साहन या. असे म्हटले जाते की, “ज्या पालकांना त्यांच्या पाल्याचा कल, मानसिकता व क्षमता समजते आणि त्यानुसार त्यांचे त्यांच्या पात्याशी आचार-विचार आणि वर्तनव्यवहार असतो, ते त्यांच्या पाल्यास घडविण्यास यशस्वी ठरु शकतात.

सर्वच पाल्ये म्हणजे, मुलं-मुली समान क्षमतेच्या आकलनाच्या व समान बुद्धिमत्तेच्या असतात. असा कुणीही पालकानी गैरसमज करून घेऊ नये. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या वेलीवरची, झाडावरची फळे, फुले वेगळी असतात, त्यांचे रंग, रूप, चव, गंध, सुगंध आणि आकार वेगळे असतात. एकासारखे दुसरे असू शकत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या पाल्याचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व असते. ते इतरांसारखे असावे, अशी अपेक्षा करणे चूक आहे. ह्याबाबत पुढील कवितेत पाल्याचे वेगळेपण कवीने सुरेख रेखाटले आहे. ते सुजाण पालक पती-पत्नीने वाचणे मनोज्ञ ठरेल.

‘मुल आणि फूल’
कोणत्याही झाडाचं कोणतंही फूल सुंदर असतं ।
कोणत्याही आईचं, कसंही मुल सुंदर असते ।
फुलाचारंग कसा? फुलाचा गंध कसा ?
असं नसतं कधी विचारायचं
फूल जन्माला येणं, हेच एक कौतुक असतं ।
मूल एक वास्तव असत, मूल एक स्वप्न असतं ।
आकाशातून अलगद आलेलं, आपलंच एक प्रतिबिंब असतं ।
आपल्या आत्म्यास, आपलंच देणं असतं ।
कोणत्याही आईचं, मूल सुंदर असतं
झाडाला फूल पेत असतं, फुलात असतं झाड उपलेलं ।
आईला मूल होतं तेव्हा मुलात असत तिन विश्व लपलेलं
निर्मिती सुरेल संगीत, प्राणातून असतं
फूल होऊन, ते जोजवायच असत.

ह्या कवितेतून पाल्यातले वेगळेपण जाणवण्यास हरकत नाही. इतकच नव्हे तर एकाच आई वहिताची अपत्यै भिन्न भिन्न क्षमतेची आकलनाची आणि बुद्धिमत्तेची असतात. म्हणून तुम्ही तुमच्या पाल्यास त्याच्या क्षमतेनुसार बाढू या फुलू या, बहरू था. फक्त त्याच्यात / तिच्यात घडणाऱ्या ह्या बदलाकडे पालक ह्या नात्याने तुमचे लक्ष असू द्या, इतकेच.

तुमच्या पाल्यास योग्य ती समज-उमज येऊ लागते. त्याला/तिला तुम्ही चांगल्य चांगल्या दर्जेदार शाळेत घातलेले असते. तुमच्या पाल्यांना अभ्यास करावा ह्या स्पर्धेच्या युगात त्याने/तिने टिकावे यासाठी तुमची धड़पड व प्रयत्न असतात. पालक ह्या नात्याने तुम्हा दोषा पती-पत्नीची ही भूमिका योग्य आहे. तुम्ही पाल्यासाठी चांगल्या दर्जेदार मार्गदर्शन (क्लासच्या शोधात असता. अशा प्रसंगी आपणास निर्देशित इच्छितो की, आता क्लासेसच्या क्षेत्रातही मार्केटिंग मोठया प्रमाणात सुरू झाले आहे. कपड्यांचे सापाचे व जोड्यांचे जसे सेल लावले जातात. त्याच्या मोठ मोठ्या जाहिराती केल्या जातात, तशीच परिस्थिती आज याही क्षेत्रात निर्माण झाली आहे. विविध संपर्क माध्यमाद्वारे आकर्षक प्रलोभने विद्यार्थी/विद्यार्थिनींना दाखवून खासगी मार्गदर्शन बगति (क्लासेसमध्ये दाखल करून घेतले जाते. वर्षभराची, काहीवेळा दोन-तीन वर्षांची फी अगोदरच घेतली जाते. आजचे तुम्ही पालक धावपळीत घाई-गडबडीत असता, तुमची इच्छा असूनही तुम्हाला तुमच्या पाल्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नसतो. असे म्हणले जाते की, “आजचा पालक त्याच्या पाल्यास विविध तन्हेची महागडी खेळणी-खेळ पुरवू शकतो. परंतु त्यास पुरेसा वेळ देऊ शकत नाही.” हे प्रयत्नपूर्वक टाळा.

तुमच्या लाडक्या पाल्यास याहीपेक्षा तुमच्या सहवासाची, आपुलकीच्या, प्रोत्साहनपर कौतुकाची अपेक्षा असते. परंतु ते तुमच्याकडून घडतनाही. तुम्ही उभयता तुमच्या नोकरी-धंद्यात कामात गर्क असता. तुमची ही धावपळ आणि पळापळ कोणासाठी? पाल्यासाठी की, तुमच्या स्वतःसाठी याचाही विसर घाई गडबडीत तुम्हास पढतो, तुमच्या या स्थितीचा, मानसिक अडचणींचा, अपरिहार्यतेचा फायदा काही कोचिंग क्लासेस उठवितात. तुमच्याशी पुनः पुन्हा संपर्क साधून, आकर्षक जाहिरातींचा मारा करून ते भुलभुलैया निर्माण करतात. तुमच्यातील काही पालक त्यास अगतिकपणे बळी पडतात. अशा परिस्थितीत तुम्ही हे विसरता की, “तुमचा पाल्य सजीव हे आहेत. तो/तो म्हणजे काही नियम किया प्रोडक्ट (product) नाही. त्याच्या/तिच्या भावभावनांचा वाढत्या वयाचा व उसलेल्या मनाचा विचार प्रत्येक पालकाने केला पाहिजे.” त्यात तुम्ही उभयता तो पत्नीने योग्य ती सतर्कता आणि जागरूकता वेळीच दाखवायला हवी.

Scroll to Top