S R Dalvi (I) Foundation

पेरणीची योग्य वेळ कोणती? दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठीचे उपाय कोणते?

What is the right time to sow? What are the measures to avoid the problem of double sowing?

महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन 1 महिना उलटला आहे. पण अद्यापही राज्यातल्या बहुतांश भागात पुरेसा पाऊस न पडल्याचं चित्र आहे.त्यामुळे काही ठिकाणी खरिपातल्या पेरण्या खोळंबल्या आहेत, तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 11 जुलैपर्यंत केवळ 47 % क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

राज्यात जवळपास 142 लाख हेक्टर क्षेत्रावर खरिप पिके आहेत. त्यापैकी 11 जुलैपर्यंत 66 लाख हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील बहुसंख्य शेतकरी पेरणीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी 8 दिवस, तर काही ठिकाणी 10 दिवसांहून अधिक खंड पावसात पडला आहेत्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येऊन ठेपलं आहे. पण, हे दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी शेतकरी वैयक्तिक पातळीवर काय करू शकतात हे समजून घेऊयात.

तुम्ही जर पेरणी केली असेल आणि काही प्रमाणात पीक उगवून आलं, असेल तर पोटॅशियम नायट्रेट हे जल विद्राव्य खते म्हणजे पाण्यात विरघळणारी खते (13:00:45)चे 70 ग्रॅम प्रती 10 लीटर पाणी टाकून फवारणी करावी. पोटॅशियममुळे रोपांमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होते. तसंच ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्रोत जसं की विहीरी, तलाव, ठिबक किंवा तुषार सिंचन उपलब्ध आहेत, त्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यावं.

ताच्या आसपास जो काही पाण्याचा साठा उपलब्ध असेल मग यात तलाव, नाला, शेततळं यांच्यातील पाण्यानं पिकांवर फवारणी होईल. जास्त पाणीही देऊ नये. अगदी 1 सेमी इतका जमिनीत ओलावा तयार होईल, इतकं पाणी द्यावं, यामुळे पिकाच्या कोंबाला ओलावा मिळेल आणि काही दिवस ते तग धरू शकेल.

महाराष्ट्रात अद्यापही जवळपास 50 % क्षेत्रावर खरिप पिकांची पेरणी बाकी असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. पाऊस पडला की बहुसंख्य शेतकरी पेरणीस सुरुवात करतील. पण, शेतकऱ्यांनी पाऊस नेमका किती पडला, हे तपासून पेरणी करणं गरेजचं आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत चांगली ओल निर्माण झाल्यासच पेरणी करावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

दोन ते तीन दिवस सतत पाऊस पडल्यास आणि 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यास शेतकऱ्यांनी पेरणी करावी. कारण, इतक्या प्रमाणात पाऊस झाला तर जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा तयार होत असतो. त्याआधी पेरणी करण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये.”

जमिनीत भरपूर ओल आल्याशिवाय पेरणी करू नये. पाऊस जमिनीत चांगला मुरू द्यायला पाहिजे. दोन-तीन पाऊस चांगले होऊ द्यायचे आणि मगच पेरणी करायची. स्थानपरत्वे आपल्या अनुभवानुसार शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा.

Scroll to Top