S R Dalvi (I) Foundation

पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना कोणती काळजी घ्यावी..

What precautions should be taken while trekking in rainy season

पावसाळा सुरु झाला की, बरसणाऱ्या धारांचा, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायची स्वाभाविकच इच्छा निर्माण होते. पण पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना आपण स्वत:साठी आणि दुसऱ्यांसाठीही धोका तर निर्माण करत नाहीये ना, याची काळजी घेणं आवश्यक आहे.

तज्ञांचे मार्गदर्शन घ्या
ट्रेकिंगला जातांना तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच जा. काहीजण अति उत्साहात एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी ‘गुगल सर्च’ चा आधार घेतात. पण गुगलमध्ये कदाचित कमी माहिती दिलेली असू शकते.

अति साहस टाळा
ट्रेकिंग साहसी प्रकारात मोडत. त्यामुळे सुरक्षिततेला प्राधान्य असलं पाहिजे. संपूर्ण ट्रेक ग्रूपने एकत्र रहा. अति साहस टाळा अति उत्साहाच्या भरात आड वाटेने जाणं टाळा.

सेल्फी काढताना अतिधाडस टाळा
अलिकडे सर्वांनाच सेल्फीचा प्रचंड नाद लागला आहे. सेल्फीमुळे जीव जाणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली आहे.त्यामुळे सेल्फीच्या मोहापायी अतिधाडस करू नका.

कंम्फरटेबल कपडे घाला
ट्रेकला जाताना फॅशनेबल कपड्यांपेक्षा कंम्फरटेबल कपडे घाला. कपड्यांचे एकदोन जोड जादा सोबत ठेवा. टॉवेल न्यायला विसरू नका. पायात रबरसोल असलेले बूट असूद्यात.

मेडिकल कीट जवळ बाळगा
ट्रेक दरम्यान कमी खाणं, कमी पाणी पिणं यामुळे प्रकृती बिघडते. अशावेळी चक्कर येऊन अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे एक मेडिकल कीट जवळ ठेवा.

निसरड्या वाटांवर शक्यतो हातात काठी ठेवा
पावसामुळे डोगरमाथे भिजल्याने वाटा निसरड्या झालेल्या असतात. तसेच अनेक ठिकाणची जमीन भुसभुशीत झालेली असते. त्यामुळे शक्यतो हातात काठी ठेवा. जर तुम्ही पावसाचा आनंद लुटण्यासाठी डोंगरमाथ्यांवर, समुद्र किनाऱ्यांवर, धबधबे, तलाव अशा ठिकाणी जाणार असाल तर ही खबरदारी आधी घ्यावी.

निसर्ग नियमांचं पालन करा
बऱ्याचदा उत्साहाच्या भरात काही लोक नियमांचं पालन करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. डोंगरावर जाताना किंवा जंगलात काही महत्वाच्या सूचना देणारे बोर्ड लावलेले असतात. त्यांचे पालन करा.

Scroll to Top