Who is Punjabrao Dakh? How accurate are their weather forecasts?
पंजाबराव डख हे पाऊस कधी पडणार? पाऊस कोणत्या तारखेला पडणार? दिवसा पडणार की रात्री पावसाचे प्रमाण किती असणार? याची अगदी तंतोतंत माहिती त्यांचा व्हॉट्सॲप ग्रुपमधून पुरवतात. सध्या हवामानखात्याने करोडो रुपये खर्च करून देखील उभारलेल्या सॅटेलाइट यंत्रणेला सुद्धा जेवढी अचूक माहिती देता येत नाही.
पंजाबराव डख हे मूळचे परभणी जिल्ह्यामधील गुगळी, धामणगाव येथील एक शेतकरी आहेत. आणि ते शेतकरी असल्यामुळे टीव्हीवर नियमित हवामान अंदाज ऐकण्याची त्याची त्यांना सवय होती. आणि हा हवामान अंदाज ऐकल्यावर पंजाबराव डक त्यांच्या वडिलांसोबत पावसाच्या अंदाजावर सातत्याने चर्चा करत असायचे. त्यांचीही निरीक्षण आणि आपल्या स्वतःच्या निरीक्षणांची नोंद करत असायचे. अनेकदा त्यांनी केलेले निरीक्षण हे तंतोतंत बरोबर ठरवायचे आणि त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अचूक पावसाचा अचूक अंदाज मिळत असल्याने जे शेतीत होणारे नुकसान आहे. शेतकऱ्यांचे नुकसान हे कमी व्हायची आणि शेतकऱ्यांना त्यापासून मदत मिळायची.
सरकारी हवामान खात्यामधील जी माहिती आहे ती अनेकवेळा शेतकर् यांसाठी निराशेचे कारण बनले होते. आणि हवामान वर्तवल्यापेक्षा वेगळेच काहीतरी व्हायचे. त्यामुळे हवामान खात्याची विश्वासहर्ता कमी झाली. आणि पंजाबराव डक या हवामान तज्ञांनी शेतकर् यांना नुकसानीपासून वाचवले होते. आणि त्यांना अचूक अशी माहिती सांगून शेतकर् यांची मने जिंकली होती. ते कोणत्याही प्रकारचे भाकीत सांगत नव्हते. ते सर्व शास्त्रशुद्ध आणि त्यांच्या सखोल निरीक्षणावर आधारित अशी माहिती शेतकर् यांना वेळोवेळी पुरवत आहेत.
हवामान अंदाज याची माहिती घेण्यासाठी ते संगणकाचा वापर करतात. उपग्रह नकाशांचा अभ्यास करून त्यांच्या निरीक्षणांची नोंद करून त्यांचा अंदाज व्यक्त करतात. जी सरकारी हवामान खाते आहेत. सॅटेलाइट आहेत. त्यांची यंत्रणा ही पंजाबराव डख यांच्या समोर कमी पडताना दिसत आहे. आणि हवामान अंदाजाचा अचूक माहिती पुरवल्यानी महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांना खूप मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाचा अंदाज आणि ज्या धोक्याच्या सूचना आहेत त्याआधीच सांगितल्यामुळे शेतकरी सतर्क राहून आपली काम वेळेवर आवरत असतात. शेतीचे कुठले काम पावसाच्या दृष्टीने प्राधान्याने आधी करावे याकडेही लक्ष देत असतात. त्यामुळे अतिवृष्टीमुळे जे पिकांची नुकसान होते ते यापासून वाचवले जात आहे. आणि त्यांची पिके सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकर् यांना पूर्वसूचना मिळतात. त्याचप्रमाणे गारांचा पाऊस कुठे पडणार आहेत? कधी पडेल त्याचे प्रमाण किती असेल? या संबंधीची संपूर्ण माहिती ते त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून महाराष्ट्रातील सर्व शेतकर् यांपर्यंत तालुक्यानुसार आणि गावानुसार पाठवत असतात.
पंजाबराव जिल्हा परिषद शाळेवर सध्या अंशकालीन शिक्षक म्हणून रुजू आहेत. त्यांचे शिक्षण हे ईटीडी आणि सी टी सी झाले आहे.
पंजाबराव डक यांना 10 एकर शेती असून ते हवामान अवर आधारित शेती करतात. त्यांच्या शेतामध्ये हरभरा सोयाबीन ही पिके घेतात. त्यामधून ते जास्तीत जास्त उत्पन्न घेतात. त्यांना एकूण 200 क्विंटल शेतमाल होतो. सोयाबीन 100 क्विंटल आणि हरभरा 100 क्विंटल असे एकूण 200 क्विंटल. अशाप्रकारे ते त्यांच्या शेतामध्ये उत्पन्न घेतात असे एकून 8,00,000 रुपये उत्पन्न होते. त्यामध्ये त्यांना एकूण नफा ₹6,00,000 एवढा होतो.