S R Dalvi (I) Foundation

आजचे युग हे यंत्रयुग म्हणून का ओळखले जाते?

Why is today's age known as the machine age?

आजच्या काळामध्ये मानवाला जागोजागी यंत्राचा वापर करावा लागतो. ही सवय मानवानी स्वतः करून घेतली आहे. मग ते शेतीचे काम असो किंवा इतर कोणतेही काम असो. आज या यंत्रयुगात पावलापावलाला माणसाला यंत्राची आवश्यकता भासते. हा माणूस सकाळी जागा होतो तो कोंबड्याच्या आरवण्याने नाही; तर घड्याळाच्या गजराने. घड्याळ बंद पडले, गजर झाला नाही तर त्याला उठण्यास उशीर होतो, कामावर जाण्यासही त्याला कुठल्या ना कुठल्यातरी यंत्राची मदत घ्यावी लागते. रेल्वेगाडी, बस, स्कूटर वा मोटार ही साधने तर माणसाच्या जीवनाची अविभाज्य भाग बनून राहिली आहेत. यंत्रे बिघडली तर तो ऑफिसात जाऊ शकत नाही. आकाशाला भिडणाऱ्या इमारतीत वर जाण्यासाठी त्याला लिफ्टची मदत घ्यावी लागते. कचेरीत काम करताना त्याला टाइपरायटर लागतो. दूरध्वनीवर तो आपले निरोप पाठवितो. संध्याकाळी परत आल्यावर त्याला करमणूक हवी असते, ती त्याला नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि चित्रपट यांद्वारे प्राप्त होते. त्याचा उन्हाळा दूर करतो एअर- कंडिशनर, तर त्याची थंडी अडवितो रूमहिटर अशा अनेक यंत्रांच्या मानव आहारी गेलेला आहे.

आज आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा असे आढळते की, माणस आता पूर्णपणे यंत्रावरच अवलंबून आहे. मग कोणी म्हणतात की, ‘आजचा हा माणूस यंत्राचा गुलाम झाला आहे. माणसाने स्वतःच्या सूखासाठी यंत्रे तयार केली; पण आज ही यंत्रेच माणसावर आधिपत्य गाजवीत आहेत. असे हे टीकाकार म्हणतात. कॉम्प्यूटरसारख्या यंत्रामुळे आणि यंत्रमानवामुळे सर्व जगातच बेकारीचा भस्मासूर थैमान घालणार की काय, असा आज प्रश्न पडला आहे. हा यंत्रमानव घरे स्वच्छ करतो, रस्त्यावरच्या रहदारीवर नियंत्रण ठेवतो, हॉटेलमध्ये वेटरचे काम देखील करतो.

शेतीतील अमाप पीक, हरितक्रांती, श्वेतक्रांती या सर्वांचे रहस्य यंत्रांतच आहे. कारखान्यांतील अचाट उत्पादन यंत्रांद्वारेच पार पडत असते. एकूण काय, माणसाची घोडदौड यंत्रांमुळेच चालू आहे. माणसाला अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य झाल्या त्या यंत्रांमुळेच. मग यंत्र हे माणसास वरदानच नाही का? यंत्रांमुळे आज सारे जग जवळ आले आहे. नेमक काय काम करतोस? मुलीचे वडिल आपल्या मुलीच्या मित्राला विचारत आहेत. त्यांच्या प्रश्नात शक्यतेच्या शोधासोबत मोठ्या प्रमाणावर सांशकता आहे. सर्जनशिलता तर ठिक आहे मात्र यात पैसा कुठे आहेत? हे दृश्य आजचे नाही तर भावी काळाचे आहे कारण त्या काळात सर्जनशिलता माणसाची नाही तर दुसऱ्याच कुणाची तरी होवून जाईल.

आज यंत्र मानवी जीवनाचा अविभाज्य अंग होवून राहिली आहेत. या यंत्रांमुळेच मी-आपण एवढे बदलले आहोत की हे दृश्य जर एखादा 15 व्या शतकापूर्वीच्या मानवाने बघितले असते तर तो हे बघून बेशुद्ध झाला असता किंवा आपल्या डोळ्यावरच विश्वास ठेवू शकला नसता. आपल जीवन यंत्रांच्या साह्याने अधिक सुखकारक करण्याच्या प्रयत्नात आज मानवाचीच यंत्र बनण्याची वेळ आली आहे एवढच नाही तर भविष्यात त्याच अस्तित्वच धोक्यात येणार आहे. यंत्रांचा पहिला संबंध माणसाच्या बेरोजगारीशी आहे. यंत्र आली, त्यांनी मानवाच्या पेक्षाही अधिक कुशलतेने आणि वेगाने कामे केली तर माणस कुठ जातील? ती आपल पोट कस भरतील? त्यांच्या कुटुंबाच काय होईल? हा प्रश्न जवळपास 200 वर्षांपूर्वी मानवाला पडला होता.

रोबो आणि सजीव यांच्यातली सीमारेषा पुसणारे अनेक जीव वेगवेगळ्या चित्रपटांत दाखवले आहेत. अनेक चित्रपटांत त्याच्या बाबत दाखवण्यात आलं आहे. एकीकडं यंत्रमानवांत जीवन भरण्याचा प्रयोग संशोधनाच्या पातळीवर होत असताना या चित्रपटांत दाखवण्यात आलं आहे तसं तर होणार नाही ना, अशीही चर्चा सगळीकडंच सुरू आहे. मायकेल लेविन यांनी ही चर्चा किंवा भीती सरसकट फेटाळून लावलेली नाही. ही भीती किंवा चिंता अकारण आहे, असं म्हणता येणार नाही. आपण जेव्हा ज्या सिस्टिम्स समजून घेऊ शकत नाही अशा सिस्टिमशी खेळू लागतो, तेव्हा आपला जो हेतू नाही असे परिणामही होऊ शकतात, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र, झेनोबोट्ससारखे छोटे जीव तयार करण्यामुळं नंतर अनेक उपयोगी शोधही लागू शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मानव भविष्यकाळात टिकून राहायची असेल तर आपल्याला या सगळ्या गुंतागुंतीच्या सिस्टिम्स छोट्या नियमांद्वारे तयार होऊ शकतात याचंही आकलन आपण करून घेण्याची आवश्यकता आहे.

यंत्रांचे ते युग माणसासाठी नवी कामं घेवून आले. यंत्र मानवालाच तर बनवायची होती आणि त्यांची दुरूस्ती करणारा ही मानवच करणार होता. माणसाच काम यंत्र करणार होती मात्र त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी मानवाचीच गरज होती त्यामुळे त्या काळात कामगार नष्ट झाले नाहीत. त्यांची कामांची स्वरूपं बदलली एवढ मात्र झाल. जी काम अगोदर मानव करायचा ती काम यंत्रांनी करायला सुरूवात केली. मानवाच काम आता या यंत्रांची देखरेख करणे. अशा प्रकारे लडाइट कामगारांची भिती आणि सांशकता दोन्ही चूकीच्या सिद्ध झाल्या ज्याला लडाइट फैलेसी या नावाने ओळखल जात.

यंत्रांमुळे मानव भावनाशून्य बनत चालला आहे. तो जितका यंत्रांसोबत जुडत चालला आहे तितकाच आपले मित्र, नातेवाईक, सहकारी आणि निसर्गापासून दूर होत चालले आहे. अशात माणसातील मानवता आणि नैतीक मूल्ये नष्ट होत चालली आहेत. यामुळे यांत्रिकीकरणाची ही क्रांती घातक आहे. ही क्रांती फक्त मानवाच्या जागी फक्त यंत्र आणत नाही तर त्याच्यापासून त्याची मानवता हिरावून घेत आहे. एकीकडे यांत्रिकीकरणामुळे त्याच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड आहे तर दूसरीकडे त्याच्या संवेदना हरवत चालल्या आहेत. अशात प्रश्न हा निर्माण होतो की, तो बिचारा कुठे जाईल.

भविष्यात आपण ज्या जगात प्रवेश करणार आहोत तिथे बेरोजगारांची संख्या वाढलेली असेल. पहिली वेळ त्यांच्यावर येईल जे केवळ एकाच प्रकारच काम करतात. भविष्यात आपल्याला चालकाची गरज लागणार नाही, न प्लंबर, न वाहतूक नियंत्रकाची ही सर्व काम रोबोट करतील किंवा असे जीव जे खास तयार केलेले असतील. मी जीव यासाठी म्हणतोय कारण यांच्यात तुमच्या-माझ्या सारखी निर्णय घेण्याची क्षमता असेल आणि कित्येक वेळा ते आपल्या पेक्षाही बुद्धीमान असतील. नंतर हळू-हळू ही यंत्र पांढर पेशा कामांनाही सांभाळतील.

मानव अशात जर विचार करत असेल की, तो कथा-कविता,संगीत-नृत्य करेल तर ही स्थिती सुद्धा जास्त काळ राहणार नाही. ही कृत्रीम बुद्धीमत्तेने संपन्न बुद्धीजीवी या कामातही मानवाला मागे टाकतील. त्यांच्या कविता आपल्या कवितांपेक्षा सरस असतील,त्यांच्या कला आपल्या कलांपेक्षाही अद्भूत असतील. अशात प्रश्न हा निर्माण होतो की, त्या वेळी मानव प्रजातीसाठी कोणते काम करण्याचा पर्याय राहिल? आपले काम केवळ पैसाच मिळवून देत नाही तर आपल्याला ओळख आणि स्वाभिमान सुद्धा मिळवून देते आपण या गोष्टीशी जरूर सहमत असाल. आपल्या कामामुळे आपल्याला समाजात स्थान मिळते. हे खरं आहे की भावी काळात पैसा कमवणारे लोक कमीत-कमी काम करतील आणि त्यांच्याकडे सर्जनशील कामांसाठी खूप वेळ असेल मात्र प्रत्येक माणसांकडे सर्जनशिलता असू शकत नाही. मग काम यंत्रांनी हिरावून घेतल्यामुळे त्यांच्यात एक वेगळ्याच प्रकारच नैराश्य निर्माण होईल. माणसांमधील आनंद, काम करण्याची जिद्द ही कमी होईल. एक दिवस मानवांवर यंत्रच राज्य करेल असे भासते. आतातरी मानव जातीने यंत्राचा उपयोग जेथे पाहिजे तेथेच करावा. त्या ऐवजी माणसांना कामे द्यावी जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सुद्धा भागेल.

Scroll to Top