S R Dalvi (I) Foundation

जागतिक सायकल दिवस का साजरा केला जातो?

Why is World Bicycle Day celebrated?

लहानपणी बऱ्याच लोकांनी सायकल चालवली असेल पण साध्य सायकलिंग ला कुणी फारसे महत्व देत नाही. पण  आजच्या धक्काबुक्कीचा जीवनात आरोग्य चांगले ठेवणे हे एक मोठे आहवान झाले आहे यामुळे बऱ्याच वेगवेगळ्या देशांमंध्ये सायकल चालवण्याला भर दिला जात आहे. 

सायकल चालवण्याचे हे फायदे जाणून घेतल्यास तुम्ही बाईक सोडून सायकलच्या प्रेमात पडाल. चला तर मग जाणून घेऊया सायकल चालवण्याचे पुढील फायदे.

सायकल का चालवावी ?

तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी  आपल्याला शारीरिकरित्या सक्रिय असणे अतयंत  आवश्यक आहे. नियमित शारीरिक हालचाल असल्यास  तुम्ही  लठ्ठपणा, मधुमेह,हृदयरोग, कर्करोग,  संधिवात आणि  मानसिक आजार,  यासारख्या गंभीर आजारांपासून वाचू  शकतात.   नियमितपणे सायकल चालवणे हे  जीवनशैलीशी संबंधित आरोग्यविषयक समस्यांचा धोका कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

सायकलिंग हा एक निरोगी, कमी परिणाम करणारा व्यायाम आहे ज्याचा आनंद लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोक घेऊ शकतात. हे मनोरंजक, स्वस्त आणि पर्यावरणासाठी चांगले आहे.

सायकलिंग हा एक एरोबिक व्यायामाचा  प्रकार असून नियमितपणे सायकलिंगच्या व्यायामामुळे ह्रदय, फुफ्फुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते. सायकलिंग मुळे शरीरात रक्त संचारण (blood circulation) व्यवस्थित होते, शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

यासाठी रोज व्यायामासाठी नियमितपणे  सायकल चालवावी. जर काही कारणामुळे  सायकल बाहेर चालवणे शक्य नसल्यास आपण घरच्याघरी किंवा जिममध्ये  व्यायामाची सायकल वापरूनही वर्कआऊट करू शकता. रेग्युलर सायकल आणि जिम सायकल यांच्यापासून होणारे फायदे एकसारखेच असतात.

सायकलचा वायम

सायकलिंग हा एक एरोबिक व्यायामाचा  प्रकार असून नियमितपणे सायकलिंगच्या व्यायामामुळे ह्रदय, फुफ्फुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते. सायकलिंग मुळे शरीरात रक्त संचारण (blood circulation) व्यवस्थित होते, शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

यासाठी रोज व्यायामासाठी नियमितपणे  सायकल चालवावी. जर काही कारणामुळे  सायकल बाहेर चालवणे शक्य नसल्यास आपण घरच्याघरी किंवा जिममध्ये  व्यायामाची सायकल वापरूनही वर्कआऊट करू शकता. रेग्युलर सायकल आणि जिम सायकल यांच्यापासून होणारे फायदे एकसारखेच असतात.

सायकल चालवण्याचे फायदे

तरुण दिसणे

सायकल चालवण्यामुळे blood cells आणि स्किनमध्ये आक्सिजनचा पुरेसा प्रवाह होतो त्यामुळे त्वचा जास्त तरुण आणि चमकदार दिसते. जीम मध्ये जास्त वेळ देऊ शकत नसाल तरी सायकल चालवायला काही तास नक्की दयावे म्हणजे तुमच्या लोकांपेक्षा तुम्ही नेहमी  जास्त तरुण आणि चमकदार दिसाल. 

फिजीकल रिलेशन अधिक चांगले होणे

सायकलिंग केल्याने बॉडीचे सर्वच मसल्स हेल्दी आणि मजबूत होतात. यामुळे तुमची सेक्सश्युअल पॉवर वाढते. एका रिसर्चमधून असे समोर आले आहे की, रोज काही वेळ सायकल चालवणारे पुरूष किंवा महिला त्यांच्याच वयाच्या दुस-या लोकांपेक्षा सेक्स लाईफचा अधिक आनंद घेऊ शकतात.

मानसिक आजार दूर होणे

काही स्टडी आणि रिसर्च नुसार हे लक्षात आले कि जे लोक physically नेहमी ऍक्टिव्ह असतात अशांचे मानसिक आरोग्य physically inactive लोकांपेक्षा जास्त चांगले राहते . मन उदास होणे, ताणतणाव, चिडचिडेपणा येणे हे सर्व सायकलिंगने कमी होते. सायकलिंग करण्याकरता तुम्ही बाहेर पडू शकता यामुळे तुम्ही नवीन नवीन दृशे एक्सप्लोर करू शकतात ज्यचामुळे तुमचा mood चांगले राहण्यास मदत मिळते.

रात्री चांगली झोप येणे

हल्ली बऱ्याच लोकांना रात्री लवकर व चांगली झोप न येणाच्या समस्या आहेत जर तुम्ही सकाळी काही तास सायकल चालवली तर तुम्हाला रात्री मस्त चांगली झोप लागेल व झोप न येणाच्या समस्या दूर होतील 

वजन नियंत्रित राहते.

सायकल चालवण्याचा व्यायाम हा वजन कमी (Weight loss)  करण्यासाठी अत्यंत मदतगार ठरतो  कारण सायकलिंगमध्ये आपल्या शरीराच्या अनेक स्नायूंचा व्यायाम होतो. सायकलिंगमुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. फक्त अर्धा ते एक तास सायकलिंगमुळे तुम्हाला संपूर्ण वर्कआऊटचा फायदा मिळतो. एक तासाच्या सायकलच्या व्यायामातून  जवळपास  500 ते 800 कॅलरीज बर्न करता येतात त्यामुळे वजन आटोक्यात  राहण्यास मदत होते. 

मधुमेह आणि कॅन्सरपासून दूर ठेवणे

वाढलेले वजन, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव यांमुळे होणाऱ्या मधुमेहाचा धोका दररोज सायकलच्या व्यायामाने कमी होतो. याशिवाय नियमित सायकलिंगमुळे आतड्याचा कँसर, स्तनाचा कर्करोग टाळता येऊ शकतो.

हृदयविकाराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणे

सायकल  चालवल्यामुळे ह्रदय आणि फुफ्फुस यांचे आरोग्य चांगले राहते. शरीरातील रक्त संचारण (blood circulation) सुरळीत राहते , हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढते तसेच  रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होते. सायकलिंगमुळे हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, पक्षाघात, डायबेटीस यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते कारण सायकलिंगमुळे  एलडीएल या वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते तसेच  फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि  रक्तदाब नियंत्रित होतो यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होते.

ब्रेन पॉवर वाढणे

अमेरिकेच्या इलिनॉय युनिव्हर्सिटीचे प्रोफेसरने अभ्यासातून निष्कर्ष काढला की सायकल चालवणा-यांची ब्रेन पॉवर सायकल न चालवणा-यांच्या तुलनेत १५-२० टक्के जास्त असते. सायकल चालवल्याने तुमचं हृदय मजबूत राहते यामुळे तुमच्या शरिरात ब्रेन सेल् वाढतात.

दुखापत होण्याचा धोका कमी असणे

जिम किंवा वजन उचलणे, जॉगिंग अशा अनेक वर्कआऊटमध्ये दुखापत किंवा इंज्युरी होण्याची शक्यता असते. सायकल चालवताना सांध्यावर ताण कमी पडतो त्यामुळे दुखापत होण्याचा धोका फारसा नसतो 

सायकलचा व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी..?

शरीराची उंची विचारात घेऊन सायकल खरेदी करावी.

सायकलचे पायदळ,सीट ,रिंग ब्रेक,रिंग चैन इत्यादी गोष्टी नियमीत आहेत कि नाही ते बघावे. 

सायकल रस्त्यावर चालवत असल्यास हेल्मेट, एल्बो पॅड वापरावे आणि वाहतुकीचे नियम पाळावेत.

सायकलची सीट मऊ आणि आरामदायी असावी.

बाहेर सायकल चालविणे शक्य नसल्यास घरातील व्यायामाची सायकल घ्यावी किंवा जिममध्ये जाऊन अपराईट बाईक, Recumbent बाईक किंवा स्टेशनरी बाईकचा वापर करावा.

पाठीचा त्रास असणाऱ्यांनी जिम किंवा घरामध्ये Recumbent सायकलचा वापर करावा. ज्यामुळे पाठीला आधार मिळतो व पाठीला त्रास होत नाही.

नियमित सायकलिंग केल्यामुळे होणारे फायदे :

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती वाढते.

वाढलेली स्नायू शक्ती आणि लवचिकता वाढते.

सुधारित संयुक्त गतिशीलता होणे.

तणाव पातळी कमी होते.

हाडे मजबूत होते.

शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.

रोगाचे प्रतिबंध किंवा व्यवस्थापन होणे.चिंता आणि नैराश्य कमी होते.

सायकलमुळे होणारे इतर फायदे :

सायकल ही कधीही व कुठेही चालवता येते.

सायकल चालवणे सोपे असते, सायकलिंगमुळे पार्किंग समस्या होत नाहीत, वाहतुकीची कोंडी होत नाही. 

सायकलमुळे अतिशय  जीवघेणे अपघात होत नाहीत.

सायकल खरेदी करण्याचा आणि देखभालीचाही खर्च हा इतर वाहनांच्या तुलनेत अत्यल्प असतो.

सायकलिंगसाठी पेट्रोल-डिझेल यासारख्या इंधनाची गरज नसते त्यामुळे इंधनाची मागणी कमी होऊन आखाती देशात जाणारा इंधनासाठी जाणारा राष्ट्रीय पैसा वाचण्यास मदत होते.

सायकलिंगमुळे ध्वनिप्रदूषणही इतर वाहनांच्या तुलनेत फारचं कमी होते.

सायकल चालवण्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. कारण सायकलिंगसाठी इंधन लागत नसल्याने हवेचे प्रदूषण होत नाही. 

Scroll to Top