S R Dalvi (I) Foundation

शिक्षक देत आहेत रुग्णांना मानसिक आधार

547 शिक्षक करत आहेत रुग्णांना मदत.

इतर वेळेस वर्गात जे शिक्षक मुलांच्या प्रगितिचा कणा बनतात ते आज या कोरोनाच्या परिस्थितीत रुग्णांसाठी मानसिक आधार देण्याचे काम करीत आहेत.

मुंबई महानगर पालिकेने नागरिकांना कोरोनाची माहिती मिळावी या उद्देशाने वॉर रूम सज्जे केले आहेत. यावर रूम मधील कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी आणि नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पालिकेच्या विविध वॉर रूम मध्ये 547 शिक्षकांची फौज तैनात आहे.

रुग्णांची विचारपूस करणं, त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या बद्दल माहिती देणं , रुग्णांना औषध आणि बेड उपलब्ध करून देणं, तुम्ही कसे आहात ? काळजी घ्या. असे आपुलकीने विचारण, हे काम सध्या विरार वसई भागातील शिक्षक करत आहेत.

हे करत असताना त्यांना चांगले वाईट अनुभव येतात. अनेकदा त्यांचं मन हेलावून जाते. शिक्षक म्हणतात ” अनेकदा रुग्ण छान प्रतिसाद देतात. त्यांच्यावरील ताण आमच्यासमोर मांडतात. त्यांना आमच्या परीने उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अनेक जण याबद्दल समाधान ही व्यक्त करून आमच्या बोलल्यामुळे छान वाटल्याचे आवर्जून सांगतात. या रुग्णांची आमचे कमी काळात नकळत व वेगळे भावनिक नाते जुळलेले असते. मात्र कधीतरी आम्ही रोज बोलत असलेली व्यक्ती अचानक आपल्याला सोडून गेल्याचे समजते. मन हेलावून जातं, अस्वस्थ वाटू लागतं.

ह्या कामातून शिक्षकांना एक मानसिक समाधान देखील मिळत आहेत. कारण त्यांच्या ह्या कार्याने ते आजारी असलेल्या लोकांच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण घेऊन येत आहेत.

अशा सर्व शिक्षक वरगाला आमचा सलाम. 🙏

Scroll to Top