S R Dalvi (I) Foundation

Maharashtra SSC Exams 2022: आजपासून १०वीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात

Topic:10th Maharashtra Board Examinations start from today

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा (Maharashtra Board Exam 2022) सुरू झाल्या आहेत. आज म्हणजेच 15 मार्च 2022 पासून महाराष्ट्र बोर्डाची 10वी परीक्षा (Maharashtra SSC Exam 2022) दोन शिफ्टमध्ये आयोजित केली जात आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या पहिल्या शिफ्टची परीक्षा सकाळी 10.30 वाजल्यापासून तर दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी 3 वाजल्यापासून होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेशी संबंधित प्रत्येक अपडेट mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. महाराष्ट्र बोर्ड परीक्षा (Maharashtra Board Exams 2022) मध्ये पेपरफुटी आणि कॉपी यासारख्या घटना रोखण्यासाठी कडक व्यवस्था करण्यात येत आहे. यासोबतच महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनाही कोविड 19 प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे. सध्या भारतात कोरोनाची प्रकरणे थोडी कमी झाली आहेत, पण तरीही विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा मोठ्या काळजीने द्यावी लागणार आहे.

16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार

आजपासून सुरू झालेल्या 10वी बोर्डाच्या परीक्षेला महाराष्ट्रात 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी बसले आहेत. कोरोनाचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच दोन वर्षांनी ऑफलाइन परीक्षा होत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षेची वेळ वाढवण्यात आली आहे. इयत्ता 10वीच्या 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे आणि 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढवण्यात आली आहेत.

Scroll to Top