S R Dalvi (I) Foundation

दिल्लीमध्ये ‘शिक्षक विद्यापीठाचे’ उद्घाटन ,जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

Topic: Inauguration of ‘Teachers University’ in Delhi, find out what are the features

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी नुकतेच म्हणजेच शुक्रवार, ४ मार्च रोजी दिल्ली ‘शिक्षक विद्यापीठाचे’ (Delhi Teachers University) उद्घाटन केले. दिल्लीतील हे पहिले विद्यापीठ असणार आहे जे प्रशिक्षित आणि उच्च पात्र शिक्षक तयार करेल. दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी याचे फोटो ही ट्विट केले आणि लिहिले आहे की, “दिल्ली शिक्षक विद्यापीठ’चे उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे.हे दिल्लीतील अशा प्रकारचे पहिले विद्यापीठ आहे जे उत्तम प्रशिक्षित आणि उच्च पात्र शिक्षक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवते. अरविंद केजरीवाल सरकारचे उद्दिष्ट आजच्या विद्यार्थ्यांना उद्याचे शिक्षक बनण्यासाठी प्रेरित करण्याचे आहे.”

शिक्षकांची नवीन पिढी घडवण्यासाठी, विद्यापीठ बीए-बीएड आणि बीएससी-बीएड सारखे शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमप्रदान करतील .विद्यापीठाचे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमांच्या कालावधीसाठी दिल्ली सरकारी शाळांशी सहयोग करतील आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करून अनुभव प्राप्त करतील.
या विद्यापीठामध्ये लेक्चर हॉल, डिजिटल लॅब आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह लायब्ररी असणार आहे. चार मजली मुख्य विद्यापीठ ब्लॉक दोन भागात विभागलेला आहे – प्रशासकीय मजला आणि शैक्षणिक मजला. तळमजल्यावर प्रशासकीय कार्यालय असेल, तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर वर्ग घेतले जातील. यामध्ये अनेक सुविधाही दिल्या जाणार आहेत.

Scroll to Top