Study like this, you will never get bored
मित्रांनो, अभ्यास केव्हा करायचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच सतावणारा आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी अभ्यास करणे चांगले आहे, तर काहींच्या मते संध्याकाळी अभ्यास करणे चांगले आहे. तथापि, आपल्या प्रत्येकाची भिन्न जीवनशैली लक्षात घेता, प्रत्येक दिवसाचा अभ्यास करण्यासाठी अचूक वेळ निश्चित करणे कठीण होऊ शकते. तुमच्या शाळेचे वेळापत्रक कसे चालते? दिवसाच्या वेळेनुसार प्रत्येक मुलाची अभ्यासाची वेळ वेगळी असू शकते. जर तुमची शाळा सकाळची असेल तर तुम्ही संध्याकाळची शांत वेळ अभ्यासासाठी निवडू शकता. जर तुम्हाला दुपारची वेळ अभ्यासासाठी चांगली वाटत असेल, तर तसे करा. तुम्ही शाळेनंतर घरी आल्यास, तुम्ही तुमच्या शाळेत शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी करू शकता.
अनेकदा सर्वच मुलांना अभ्यास करताना लवकर कंटाळा येतो आणि ते अभ्यास मध्येच सोडून उठतात. अशाप्रकारे, अभ्यासात मधेच उठल्यामुळे त्यांचे सातत्य बिघडते आणि ते अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. ज्यामुळे त्यांना काय लक्षात ठेवायचे आहे ते लक्षात ठेवता येत नाही. मग जेव्हा तुम्हाला गोष्टी आठवत नाहीत, तेव्हा तुमचे मन अभ्यासातही गुंतत नाही आणि तुमचे मार्क्सही कमी येऊ लागतात.
ठराविक वेळेनंतर ब्रेक घ्या
सतत अभ्यास करणे कधीही शक्य होत नाही. तुम्ही तुमच्या अभ्यासादरम्यान ठराविक वेळेनंतर 10-15 मिनिटांचा ब्रेक घ्यावा, त्यानंतर पुन्हा अभ्यासाला बसा. तुम्ही जे काही वाचत आहात ते तुम्हाला आठवते आहे का ते बघा. 1 तास अभ्यास केल्यानंतर, 10 किंवा 15 मिनिटांचा ब्रेक घ्या आणि नंतर परत अभ्यासाला बसा.
फोन सायलेंट वर ठेवा-
अभ्यास करताना फोन नेहमी सायलेंट वर ठेवा. फोनवर येणार्या नोटिफिकेशन्स तुमचे लक्ष अभ्यासापासून विचलित करतात. अभ्यास करताना तुमचा फोन नेहमी दूर ठेवा. यामुळे तुमच्या अभ्यासात सातत्य टिकून राहून तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करता.
शांत जागा निवडा-
तुम्ही जेंव्हा अभ्यासाला बसाल तेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करणार आहात त्या ठिकाणचे वातावरण शांत असावे हे ध्यानात ठेवावे. कोणत्याही प्रकारचा आवाज नसावा. वातावरणातील गोंगाट तुमचे लक्ष विचलित करू शकतो, ज्यामुळे तुमचे सातत्य बिघडू शकते. नेहमी शांत वातावरणात बसून अभ्यास करावा.
अन्न आणि पेय दूर ठेवा-
अनेक मुलं अभ्यास करताना खाण्यापिण्यासोबत बसतात आणि अभ्यासादरम्यान काहीतरी खात राहतात. त्यामुळे त्यांचे मन जेवणात जास्त आणि अभ्यासात कमी असते. अशा परिस्थितीत तुम्ही कधीही अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणूनच अभ्यास करताना खाण्यापिण्यापासून दूर ठेवा.
तुम्हाला अवघड वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास आधी करा
तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता तेव्हा सुरुवातीला तुमच्यात खूप उर्जा असते. म्हणून सुरुवात नेहमी अवघड विषयापासून करायाला हवी. सोप्पा विषय शेवटी घ्या. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त वेळ अभ्यास करू शकताय.