S R Dalvi (I) Foundation

आदर्श शाळा निर्मिति प्रकल्प: शाळेतील नवीन वर्ग खोल्यांसाठी ७५ कोटी वितरित, शालेय शिक्षण मंत्र्यांची माहिती 

Topic: Adarsh ​​Shala Nirmiti Project: 75 crore distributed for new classrooms in schools in the state, information of the Minister of School Education

शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील ४८८ सरकारी शाळांना मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्याची योजना आखली होती. वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे ‘आदर्श शाळा प्रकल्पची’ स्थापना केली आहे अशी माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत,”’राज्यातील शासकीय शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आदर्श शाळांची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात निवडलेल्या ४८८ पैकी ३२८ शाळांमध्ये नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. अशी ही माहिती दिली आहे.यापूर्वी याच प्रकल्पांतर्गत ३५५ शाळांमध्ये दुरुस्ती/ लहान बांधकामासाठी रु. ५३.९७ कोटी वितरीत केले होते.

आपल्या विद्यार्थ्यांना प्रगत आणि उत्तम शिक्षण मिळावे आणि प्रत्येक शालेय वर्गात शिक्षणासाठी उत्तम पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे”. असे ही त्यांनी लिहिले आहे. ‘हा प्रकल्प आमच्या विद्यार्थ्यांना प्रगत आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि प्रत्येक शाळेच्या वर्गात शिकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत आहे’ अशी माहिती ही त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे.

Scroll to Top