S R Dalvi (I) Foundation

कोल्हापूरच्या कस्तुरीने सर केले माउंट एव्हरेस्ट; शालेय शिक्षण मंत्र्यांनी ही ट्वीट करत केले अभिनंदन

Topic: Kolhapur girl Kasturi Savekar successfully summits Mount

कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने अखेर एव्हरेस्ट शिखरावर आपले स्थान निर्माण केले आहे. शनिवारी, 14 मे रोजी सकाळी 6 वाजता तिने जगातील सर्वात उंच आणि तितक्याच अवघड माउंट एव्हरेस्टची चढाई पूर्ण केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असून कस्तुरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनी ही माहिती दिली आहे.कस्तुरी सावेकर ही गेल्या वर्षी एव्हरेस्ट चढण्याच्या मोहिमेवर गेली होती. शेवटचा टप्पा अजून बाकी असला तरी खराब हवामानामुळे तिला मोहीम थांबवून परतावे लागले. मात्र,तिने एव्हरेस्ट चढण्याचा संकल्प सोडला नाही. आणि अखेर एव्हरेस्ट सर करून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची मान तिने अभिमानाने उंचावले आहे.

कस्तुरी सावेकर अन्नपूर्णा गाठणारी ही सर्वात तरुण गिर्यारोहक आहे. त्या शिखरावर तिरंगा फडकवून तिने मोठे आणि कठीण असे काम केले होते. आता तिने एव्हरेस्टवर चढाई करून ही तिचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे.