S R Dalvi (I) Foundation

राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णात वाढ, पहा शाळा- विद्यापीठे बंद करण्यावर काय म्हणाले आदित्य ठाकरे

Topic :

See what Aditya Thackeray said on the closure of schools and universities

ओमिक्रॉनची मुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांची चिंता वाढली आहे. मुलांना ओमिक्रॉनची लागण होऊ नये म्हणून शाळा बंद करण्याचा दबावही पुन्हा वाढला आहे. याबाबत राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला पोहोचलेल्या आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, 15 दिवसांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाळा आणि विद्यापीठे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल. आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर यावेळी बोलताना भाष्य केलं. “पुढील वर्षी फेब्रुवारी काय किंवा आत्ता काय. वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकतो”. असे मत ही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आदित्य यांनी लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, जर कोरोना थांबवायचा असेल तर आपल्याला कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. जर ते फार महत्वाचे नसेल तर बाहेर पडू नका आणि जर बाहेर गेलात तर नक्कीच मास्क घाला. नागरिकांनी पॅनिक व्हायची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही ओमायक्रॉन गंभीर नसल्याचा सगळीकडे समज आहे. पण ते तसंच राहील का? यावर सविस्तर संशोधन झालेलं नाही. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे”, असं हीआदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
यापूर्वीच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही ”सरकारकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यास शाळा बंद होतील. असे एका निवेदनात म्हटले होते.

Scroll to Top