S R Dalvi (I) Foundation

‘गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमात भगवद्गीता आणि संत साहित्याचा समावेश करावा’, भाजपने केली मागणी

Topic: BJP demands inclusion of Bhagavad Gita and Sant Sahitya in the school curriculum in Maharashtra like Gujarat

गुजरात सरकारने (Gujrat Government) घेतलेल्या निर्णयानंतर आणि कर्नाटक सरकारनेही (Karnataka Government) त्यावर सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्यानंतर आता महाराष्ट्रातील शाळांमध्येही (Maharashtra School) भगवद्गीता (Bhagavad Gita) शिकवण्याची मागणी होऊ लागली आहे. भगवद्गीता आणि संत साहित्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याकडे केली आहे.

गुजरात सरकारने आपल्या राज्यातील शाळांमध्ये इयत्ता 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना भगवत गीतेचे सार शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातच्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरातचे शिक्षणमंत्री जितू वाघानी (Jitu Vaghani ) यांनी ही घोषणा केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. गुजरात सरकारचा हा निर्णय गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये लागू असेल. यानंतर कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनीही कर्नाटकच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचे संकेत दिले आहेत. या राज्यांनंतर आता महाराष्ट्रातही शाळांच्या अभ्यासक्रमात भगवद्गीता आणि संत साहित्याचा समावेश करण्याची मागणी भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवन जगण्याचा मार्ग आहे, असे सांगत भगवद्गीता शाळांमध्ये शिकवण्याची मागणी भाजपच्या (BJP)अध्यात्मिक शाखेचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी केली आहे. शालेय शिक्षणात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय अतिशय चांगला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र सरकारनेही शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या संत साहित्याचा समावेश करावा. यामुळे भावी पिढ्यांमध्ये चांगले संस्कार रुजतील.महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही राजकारण न करता भगवद्गीता आणि संत साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा. अशी मागणी भाजपच्या वतीने तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

Scroll to Top