S R Dalvi (I) Foundation

वाचन कौशल्य विकास

Development of reading skills

शाळेची पायरी न चढलेला व्यक्ती सांगतो की, शिक्षण म्हणजे किमान लिहिता-वाचता येणे. याचाच अर्थ वाचन आणि लेखन हे शालेय शिक्षणाचे दोन अतिशय महत्त्वाचे आणि गरजेचे टप्पे आहेत. आपल्या रोजच्या जगण्यात वाचन व लेखन या दोन गोष्टींची आपल्याला पदोपदी गरज पडत असते. एका ठरावीक वयानंतर या गोष्टी इतक्या अंगवळणी पडतात की, त्या आपण कशा पद्धतीने शिकलो, हे आपल्याला निश्चितपणे सांगता नाही. काहींना या दोन्ही क्रिया सहज जमून जातात, काहींना त्यासाठी सुरुवातीला थोडेफार प्रयत्न करावे लागतात. पण काही ठरावीक कालावधीनंतर जमून जातं. पण आवर्जून काही वाचण्याकडे त्यांचा फारसा कल दिसून येत नाही.

मुलांना वाचायला शिकविताना कोठून सुरुवात करावी अथवा कशी सुरुवात करावी, याबद्दल पालकांनी पाल्यासाठी वा शिक्षकांनी विद्यार्थ्यांकरिता या विषयासंदर्भात अधिक डोळसपणे आणि व्यापक स्वरूपात विचार करणे आवश्यक आहे.

वाचन हे भाषा विकासातील एक म्हत्वाचे कौशल्य आहे , ते ऐकणे आणि बोलणे या कौशल्यावर आधारित आहे.तसेच वाचन करण्यासाठी अगोदर ऐकणे, बोलणे हे कौशल्य विकसित होणे महत्वाचे आहे . 

वाचनप्रक्रियेत येणाऱ्या सामान्य अडचणी म्हणजे वाचनाचा कंटाळा येतो, काही पाने वाचली की लक्ष विचलित होते, एकाग्र मनाने वाचता येत नाही, कठीण शब्द सतत अडतात, लांबलचक वाक्ये पटकन समजत नाहीत. 

मुलांना जर वाचता आले नाही तर ते निराश होऊ शकतात किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. मुलांचे वाचन आकलन सुधारण्यासाठी पालक व शिक्षक यांनी प्रयत्न करायला हवा. 

एक प्रसिद्ध म्हण आहे की “मी जे ऐकतो ते विसरून जातो, मी जे पाहतो ते मला लक्षात राहते, मी जे करतो ते मी समजून घेतो”. 

मुले जे कार्य स्वतः करतात त्यांना त्याच्या मागची संकल्पना जास्त लवकर लक्षात राहते. अ‍ॅक्टिव्हिटी पुस्तके किंवा रंगीत पुस्तकांमधून अभ्यास करताना मुलांचे लक्ष विचलित होत नाही. अशी पुस्तके ऑनलाईन मोफत मिळतात त्यांच्या प्रिंट्स काढून  पालक ते आपल्या मुलांना देऊ शकतात. अशा विविध उपक्रमांमुळे मुलांची लिहायची व वाचनाची क्षमता वाढवण्यास मदत नक्कीच होते.

वाचन वाढवण्यासाठी तुम्ही कितीही युक्त्या वापरल्या तरी नित्य अभ्यासाशिवाय मुलांच्या कौशल्यामध्ये वाढ होणे कठीण आहे. म्हणूनच दिवसातून कमीतकमी 15 ते 20 मिनिटे पालकांनी मुलांबरोबर बसून वाचन करा व त्यांना कुटुंबातील इतर सदस्यांना सुद्धा वाचून दाखवण्यासाठी प्रोत्साहित करा.

एकदा मूल वाचण्यास शिकल्यानंतर, वाचण्याच्या आकलनावर कठोर परिश्रम करणे महत्वाचे आहे. चांगल्या शैक्षणिक वाढीसाठी आणि जीवनात यशस्वी होण्याचा तो आधार आहे. 

Scroll to Top