S R Dalvi (I) Foundation

शिक्षण – हसत खेळत मुलांना घडवणारे

Children should be educated in a creative and happy manner.

विद्यार्थी जर आनंदी नसतील, त्यांचे शिकवण्याकडे नसेल किंवा जर त्यांना तास चालू असताना झोप येत असेल ,अशावेळेस मिळणाऱ्या शिक्षणातून त्यांची जडण घडण होत असेल का? मला असे वाटते कि प्रत्येक शिक्षकाने याचा विचार करायला हवा आहे .

मुलांना शिक्षण हे ओझं वाटू नये, मुलांनी शिकावे, त्यांना शाळेची ओढ लागावी म्हणून शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल करणे आता फार गरजेचे आहे. फळा, खडू आणि पुस्तके या पलीकडे जाऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण पद्धती मध्ये व्हायला हवा.

विद्यार्थ्यांनी हसत खेळत शिकावे म्ह्णून शासनाने मुलांच्या अभ्यासक्रमातही खूप बदल केले आहेत. शासनाने मुलांच्या दप्तराचे ओझेही आता कमी केले आहे . डिजिटल क्लासरूम चा वापर करून मुलांना शिकवताना व्हिडिओ, निरनिराळ्या गोष्टी, गाणी यांचा वापर प्रत्येक शिक्षकाने वर्गात करायला हवा . खेडेगावांमध्ये जेथे डिजिटल कलासरूम, इंटरनेट, उपलब्ध नाही तेथे शिक्षकांनी स्वतःची कला वापरून मुलांना गाणी गाऊन, गोष्टी सांगून, विविध उपक्रमांद्वारे शिक्षण द्यायला हवे असे मला वाटते .

विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण पद्धतीने म्हणजे हसत खेळत दिलेले ज्ञान हे चिरकाल टिकते. चला तर मग शिक्षकांनो सर्व विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण देऊन एक आनंददायी यशस्वी पिढी घडवुयात.

4 thoughts on “शिक्षण – हसत खेळत मुलांना घडवणारे”

  1. खूप छान उपक्रम आहे आम्हालाही सहभागी करून घ्यावे जिल्हा परिषद नांदेड येथील मी एक शिक्षक आहे

  2. Ramachandraa Dalvi

    धन्यवाद सर ,
    तुम्ही आम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या .पुढील आठवड्यामध्ये आम्ही तुम्हाला संपर्क करू .

Comments are closed.

Scroll to Top