S R Dalvi (I) Foundation

फिक्स्ड डिपॉझिटमुळे तुमचं नुकसान होतं? जास्त नफा देणारे पर्याय कोणते?

Do Fixed Deposits Cause You Loss? Which options are more profitable?

फिक्स डिपॉझिट अर्थात मुदत ठेव. लोकांचा बँकांवर विश्वास असल्याकारणाने बऱ्याचदा लोक आपल्या आयुष्याची कमाई या मुदत ठेवींमध्ये गुंतवतात. एका विशिष्ट कालमर्यादेसाठी ही मुदत ठेव ठेवली जाते. जेवढ्या कालावधीसाठी आपण ही रक्कम ठेवणार त्याचं व्याज आणि मूळ रक्कम आपल्याला परत मिळते.

पण जेव्हा देशात एखादी नैसर्गिक आपत्ती येते किंवा युद्धासारख्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं तेव्हा सरकार बँकेकडे जमा केलेल्या मुदत ठेवींचा वापर करू शकते. आजवर तरी आपल्या सरकारला तशी गरज पडलेली नाही. आणि भविष्यात भारत सरकारला अशी गरज पडेल याची शक्यताही जवळपास शून्य टक्के आहे. त्यामुळे फिक्स डिपॉझिटवर लोक जास्त विश्वास ठेवून असतात.

थोडक्यात, या मुदत ठेवींवर कोणत्याही प्रकारची रिस्क नसते. पैसा बाजारात ज्या जोखमी असतात त्यांचा आणि या मुदत ठेवींचा संबंध दुरान्वये नसतो. पण या मुदत ठेवींवर जो व्याजदर मिळतो तो कमी असतो. अनेक बँकाकडून मुदत ठेवींवर जे व्याज दिलं जात ते सध्याच्या महागाईच्या दरापेक्षाही कमी आहे.

आपण समजून घ्यायला हवं की, मुदत ठेवींत पैसे गुंतवून आपण त्या बचतीचं मूल्य कमी करतोय. ठराविक कालावधीनंतर आपल्याला एकरकमी पैसे मिळतील या विश्वासाने लोक मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करतात.

कारण त्यांच्याकडे माहितीचा अभाव असतो. पण बाजारात इतरही बरेच ऑप्शन आहेत ज्यातून चांगला परतावा मिळू शकतो. म्हणजे प्लॅन तयार करून बाजारात गुंतवणूक करून त्यातून मिळालेल्या परताव्यात आणि मुदत ठेवींमधून मिळालेल्या परताव्यात कमालीची तफावत असते.

फायनान्स एक्स्पर्ट सांगतात की, बचत ही दीर्घकालीन ठेव आहे. जर तुम्ही मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल तर मार्केट रिस्क सुद्धा कमी होते.

याव्यतिरिक्त कमी रिस्क आणि कमी कालावधी असलेले ऑप्शनही बाजारात उपलब्ध आहेत. आणि यातून फिक्स डिपॉझिटपेक्षाही जास्त परतावा मिळतो. कमी रिस्क असलेले असे चार ऑप्शन्स समजून घेऊ.

इंडेक्स फंड

ज्या प्रमाणे म्युच्युअल फंडचे पैसे विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात अगदी तसंच इंडेक्स फंडचे पैसेही शेअर्समध्ये गुंतवले जातात. पण म्युच्युअल फंडमध्ये जसा फंड मॅनेजर असतो तसा फंड मॅनेजर इंडेक्स फंडमध्ये नसतो. म्हणजेच या फंडातून होणारी गुंतवणूक ही ऑटोमेटेड गुंतवणूक असते.

म्युच्युअल फंडची गुंतवणूक करताना एखाद्या फंड मॅनेजरच्या देखरेखीखाली गुंतवणूक केली जाते. यात मार्केटमध्ये जो रेट सुरू आहे त्याहीपेक्षा जास्त परतावा मिळवा असा उद्देश असतो. पण इंडेक्स फंडमध्ये सुसंगत आणि सुरक्षित परतावा मिळावा हा उद्देश असतो.

एक्सचेंज ट्रेडेड फंड

एक्सचेंज ट्रेडेड फंड देखील इंडेक्स फंडासारखाच असतो. या दोन्ही फंडांमधून तुम्ही विविध कंपन्या आणि क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करू शकता. पण या दोन्ही फंडांमध्ये थोडा फरक आहे.

• एक्सचेंज ट्रेडेड फंड हा निवडलेल्या निर्देशांकाच्या जवळ असतो. त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेता एक्सचेंज ट्रेडेड फंड इंडेक्स फंडांपेक्षा उजवा ठरतो.

• इंडेक्स फंडांकडे जसा एसआयपीचा ऑप्शन आहे तसा एसआयपीचा ऑप्शन एक्सचेंज ट्रेडेड फंड्सकडे नाही.

• एक्सचेंज ट्रेडेड फंडांद्वारे तुम्हाला युनिट्स खरेदी करता येतात. म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंडांतून तुम्हाला जेवढे युनिट्स खरेदी करायचे आहेत तेवढीच रक्कम दिली जाते. या फंडातील युनिटची रक्कम किमान किंमत निर्देशांकावर ठरते.

• पण इंडेक्स फंडात तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकता. तुम्हाला ज्या कंपनीचे जेवढे युनिट्स खरेदी करायचे आहेत तेवढे युनिट्स खरेदी करून गुंतवणूक करू शकता. इंडेक्स फंडाच्या युनिटची सुरवात 500 रुपयांपासून सुरू होते.

• इंडेक्स फंड दिवसात कधीही विकता येतो. मात्र एक्सचेंज ट्रेडेड फंडांत तसं नसतं. क्लोजिंग टाइमला जी रक्कम ठरवली जाते त्यावरच युनिटची खरेदी विक्री चालते.

डिबेंचर्स म्युच्युअल फंड

डिबेंचर्स म्युच्युअल फंड्समध्ये तुमची गुंतवणूक करण्यासाठी एखादा फंड मॅनेजर नेमला जातो. हा फंड मॅनेजर आपल्या पैशातून विविध बॉण्ड्स खरेदी करतो आणि त्या बॉण्ड्सवर जे व्याज मिळतं ते आपल्याला परत करतो.

म्हणजे हा कर्जासारखा व्यवहार आहे असं म्हणता येईल. या फंडांमध्ये फंड मॅनेजरची भूमिका महत्त्वाची असते. कारण विविध क्षेत्रांतील बाँड्सद्वारे जे व्याज दिलं जातं त्यात मोठा फरक असतो.

आता जर इक्विटी म्युच्युअल फंड आणि या डिबेंचर्स म्युच्युअल फंडची तुलना केली तर यातून मिळणारा परतावा इक्विटी म्युच्युअल फंडपेक्षा कमी आहे. मात्र यात रिस्कही कमी आहे. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये रिस्क मोठी असते. अर्थात डिबेंचर्स म्युच्युअल फंडमधून ज्या प्रकारचा परतावा मिळतो तो फिक्स डिपॉझिट पेक्षा केव्हाही जास्तच असतो.

गिल्ट म्युच्युअल फंड

गिल्ट म्युच्युअल फंड हा डेबिट म्युच्युअल फंडाच्या तोलामोलाचा ऑप्शन आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे यात जी गुंतवणूक केली जाते ती फक्त सरकारी बाँडस मध्येच केली जाते. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार या रोख्यांवर (बॉण्ड्स) नियमित व्याज देतात म्हणून या फंडमध्ये रिस्क फॅक्टर खूपच कमी आहे.

सेबीच्या नियमांनुसार, गिल्ट फंड्स पोर्टफोलिओला 80% रक्कम ही सरकारी रोख्यांमध्ये गुंतवावी लागते. फिक्स डिपॉझिटच्या तुलनेत बघायला गेलं तर गिल्ट म्युच्युअल फंडमधूनही चांगला परतावा मिळतो.

Scroll to Top