S R Dalvi (I) Foundation

चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण म्हणजे काय?

What are lunar eclipses and solar eclipses?

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा ग्रहण पाहायला मिळू शकतं, याविषयी आपण शाळेत शिकलो आहोत. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे ग्रहणांचे दोन मुख्य प्रकारही तुम्हाला माहिती असतील.

थोडी उजळणी करुयात. अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आला की सूर्य चंद्राआड झाकल्याचं म्हणजे सूर्याला ग्रहण लागल्याचं पृथ्वीवरून दिसतं.

तर सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी असेल तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, म्हणजे चंद्राला ग्रहण लागतं.

ग्रहणाच्या स्थितीत सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती आहे? ते नेमके सरळ रेषेत आहेत का? आणि तुम्ही पृथ्वीवर नेमके कुठे आहात? या तीन गोष्टींवर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो.

छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय?

penumbral lunar eclipse

पृथ्वीच्या सावलीचे प्रच्छाया (गडद सावली किंवा सावलीच्या मधला भाग) आणि उपछाया (थोडी पुसटशी, बाजूची सावली) असे दोन प्रकार आहेत.

पृथ्वीची प्रच्छाया चंद्रावर पडते तेव्हा खग्रास किंवा खंडग्रास स्थिती दिसू शकते. पण जेव्हा पृथ्वीची उपछाया चंद्रावर पडते तेव्हा त्या पुसटशा सावलीनं जे ग्रहण दिसतं, त्याला छायाकल्प चंद्रग्रहण किंवा penumbral lunar eclipse असं म्हणतात.

कधी कधी सावलीतला हा फरक मानवी डोळ्यांना चटकन लक्षात येईल इतका प्रभावी नसतो. अतिशय छोट्या स्वरुपाचं हे ग्रहण असतं.

खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लड मून म्हणजे काय?

total lunar eclipse

चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली आला तर त्या स्थितीला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. म्हणजेच इंग्रजीत total lunar eclipse.

खग्रास स्थितीतही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. त्यामुळे या ग्रहणात चंद्राचा हा भाग थोडा गडद लालसर दिसू लागतो. याला ब्लड मून असं संबोधलं जातं.

खंडग्रास चंद्रग्रहण केव्हा दिसतं?

lunar eclipse

चंद्राचा फक्त काही भागच पृथ्वीच्या सावलीखाली आला तर खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. यालाच इंग्रजीत partial solar eclipse म्हणतात.

ही सावली किती मोठी आहे, तितका याचा प्रभाव दिसून येतो. यावेळी चंद्रावर गडद लालसर ते चॉकलेटी रंगछटा दिसून येतात.

खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?

Total Solar Eclipse

पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला ‘खग्रास सूर्यग्रहण’ असं म्हणतात.

एरवी चंद्र सूर्यापेक्षा, अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळं त्यामुळं पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकारानं एकसारखे दिसतात. आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्राचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकतं.

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस एखाद्या कोपऱ्यातून सूर्यप्रकाश डोकावतो तेव्हा त्या स्थितीला ‘डायमंड रिंग’ म्हणजे हिऱ्याची अंगठी म्हणून ओळखलं जातं.

खंडग्रास सूर्यग्रहण कधी दिसतं?

खंडग्रास सूर्यग्रहण

सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो, त्याला ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ असं म्हणतात. या ग्रहणादरम्यान सूर्याची ‘कोर’ पाहायला मिळू शकते.

खग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहणादरम्यान आसपासच्या प्रदेशात खंडग्रास स्थिती दिसू शकते.

कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?

पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काहीशा लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदूजवळ असतो, अशा वेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो.

याचदरम्यान जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो; पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. त्यालाच ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात. सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी ‘Ring of Fire’, अग्निवलय, अग्निकंकण अशीही नावं दिली आहेत.

कंकणाकृती सूर्यग्रहण

हायब्रीड सूर्यग्रहण काय असतं?

हायब्रिड सूर्यग्रहण हे अतिशय दुर्मिळ प्रकारचं सूर्यग्रहण आहे. यात काही ठिकाणी कंकणाकृती तर काही ठिकाणी खग्रास स्थिती पाहायला मिळते. 20 एप्रिस 2023 रोजी असं ग्रहण पाहायला मिळालं होतं.

पृथ्वी गोलाकार आहे आणि तिच्या पृष्ठभागावर तुम्ही नेमके कुठे, यावर तुम्हाला हे ग्रहण कसं दिसेल हे अवलंबून असतं. तुम्ही चंद्राच्या जवळ असाल तर सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. तुम्ही थोडं दूर असाल तर सूर्य पूर्ण झाकला न गेल्यानं तुम्हाला कंकणाकृती ग्रहण दिसेल.

ग्रहण किती वेळा दिसतं?

एका वर्षात संपूर्ण पृथ्वीवरून किमान दोन ते पाचवेळा सूर्यग्रहणं दिसू शकतात. त्यातलं एखाददुसरंच खग्रास ग्रहण असतं आणि तेही सगळ्याच देशांतून दिसत नाही. आणि कंकणाकृती ग्रहण पाहण्याची संधी त्याहीपेक्षा दुर्मिळ असते.

साधारणपणे प्रत्येक सूर्यग्रहणानंतर पुढच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण पाहता येतां. सूर्यग्रहण पृथ्वीवरील मर्यादित प्रदेशातून दिसतं तर चंद्रग्रहण तुलनेनं मोठ्या प्रदेशातून पाहता येतं.

diamond ring

ग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी?

ग्रहण पाहताना कधीही सूर्याकडे थेट पाहू नका. कारण सूर्याच्या तीव्र कीरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. ग्रहण पाहण्यासाठीचे खास फिल्टर लावलेले चष्मे घालूनच ग्रहण पाहावे. पिनहोल कॅमेरा, घरातली चाळणी किंवा सौर दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या पडद्यावर पाडून ग्रहणाची स्थिती पाहता येते.

छायाकल्प

‘गैरसमज बाजूला सारून ग्रहणाचा आनंद घ्या’

ग्रहणाविषयी आपल्याकडे खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. राहू- केतू हे राक्षस सूर्याला गिळतात म्हणून सूर्यग्रहण होतं असं लोकांना वाटायचं. ग्रहणात हवा, पाणी अन्नपदार्थ दूषित होतात असा एक मोठा गैरसमज होता. त्यामुळं पूर्वी ग्रहण सुटल्यावर लोक आंघोळ करीत असत, साठवलेले सर्व पाणी ओतून टाकीत व नव्याने पाणी भरत असत.

छायाकल्प

पण अशा प्रथा चुकीच्या असल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण सांगतात, “ग्रहण सुटले म्हणून आंघोळ करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण ग्रहणात काहीही अशुद्ध होत नाही. ग्रहणात जेवू नये, ग्रहणात झोपू नये, ग्रहणात मलमूत्र विसर्जन करू नये असेही सांगितले जाते.

“परंतु त्यात काहीही तथ्य नाही. काही लोक मला प्रश्न विचारतात की, आमच्या राशीला हे ग्रहण कसे आहे? मी त्यांना सांगतो, की जे लोक ग्रहण पाहतील, त्यामागचे वैज्ञानिक कारण समजून घेतील त्यांच्या राशीला हे ग्रहण शुभ आहे.”

Scroll to Top