S R Dalvi (I) Foundation

प्रत्येक दिवस ‘नारी’चाच…

Topic: Every day is woman’s day

राष्ट्रीय महिला दिनाबाबत ( Women’s Day )अनेकांच्या मनात संभ्रम आहे की तो ८ मार्चला आहे पण ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. महिला दिनाच्या निमित्ताने देशाच्या आणि जगातील अशा महिलांची आठवण येते ज्यांनी जागतिक पातळीवर आपली छाप सोडली आहे. हा विशेष दिवस साजरा करण्यामागे त्या महिलांचे कर्तृत्व, त्यांची आवड, त्यांचा ऐतिहासिक प्रवास आणि त्यांचे जीवन लक्षात ठेवणे हा आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा ( International Women’s Day) इतिहास शतकाहून अधिक मागे गेला आहे. 1911 मध्ये पहिल्यांदा महिला दिन साजरा करण्यात आला. या दिवसाबाबत लोकांची वेगवेगळी मते आहेत. काही लोक हा दिवस साजरा करण्याचे कारण स्त्रीवाद मानतात. मात्र, त्याची मुळे कामगार चळवळीशी जोडलेली आहेत. युनायटेड नेशन्सने निवडलेले राजकीय आणि मानवी हक्क लक्षात घेऊन, महिलांच्या राजकीय आणि सामाजिक उत्थानासाठी हा दिवस साजरा केला जातो.
प्रसिद्ध जर्मन कार्यकर्त्या क्लारा झेटकिन यांच्या प्रयत्नांमुळे, 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने महिला दिनाचे आंतरराष्ट्रीय स्वरूप आणि या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यास मान्यता दिली. यानंतर 19 मार्च 1911 रोजी डेन्मार्क आणि जर्मनीमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. मात्र, १९२१ मध्ये महिला दिनाची तारीख बदलून ८ मार्च करण्यात आली. तेव्हापासून जगभरात केवळ ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो.
‘नारी सबपे भारी’ किंवा ‘प्रत्येक पुरुषाच्या मागे भक्कम पणे उभी राहणारी एक बाईच असते’ ही आणि अशी बरीच वाक्य आपण आतापर्यंत ऐकत आलो आहोत. दरवर्षी महिला दिन कोणत्या ना कोणत्या थीमवर आधारित असतो. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, यावेळी आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 (IWD 2022) ची थीम आहे ‘लिंग समानता आज एक शाश्वत उद्यासाठी’ म्हणजेच मजबूत भविष्यासाठी लैंगिक समानता आवश्यक आहे.
काही वर्षांपूर्वीची नारी आणि २१ व्या शतकातील नारी मध्ये आता मोठ्या प्रमाणावर बदल झालेला पहायला मिळतो. स्त्री हे देवीचे रूप आहे. या स्वरूपातील पूजा ही आपली परंपरा आहे, परंतु बदलत्या काळात महिलांना सर्वच क्षेत्रात आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली आहे. आणि ही संधी इथल्या क्रीडा, शिक्षण, समाजसेवा आणि प्रशासकीय क्षेत्रातील महिलांच्या भक्कम उपस्थितीमुळे आपण खरोखरच पूजनीय आहोत याची जाणीव करून दिली आहे. आता एक ही क्षेत्र असे उरले नाहीये जिथे महिला काम करत नाही. बस कंडक्टर पासून ते अगदी ट्रेन चालवण्यापर्यंत महिला पहायला मिळतात. मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही मध्ये भक्कमपणे अभी राहिलेली आणि स्वतःची जागा निर्माण केलेल्या महिलेसाठी एक दिवस कसा पुरे पडेल त्यामुळे नारीचा सन्मान हा एक दिवस नाही तर संपूर्ण ३६५ दिवस व्हायला हवा. तुम्हाला याबद्दल काय वाटत ते आम्हाला या लेखाखालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा.

Scroll to Top