S R Dalvi (I) Foundation

ऑनलाइन बँकिंगमध्ये कशी टाळणार फसवणूक?

How to avoid fraud in online banking?

अनेक जण रोजच्या बहुतेक व्यवहारासाठी ऑनलाइन बैंकिंगचा वापर करतात. कारण हे अत्यंत सोपे आहे. कोरोना काळात सरकारनेही ऑनलाइन बँकिंग व्यवहारांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले. बँकांनीही या काळात ऑनलाइन व्यवहारांसाठी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली. अनेक कंपन्यांनी यासाठी खास ॲप्स विकसित केले. परंतु अलीकडच्या काळात या ऑनलाइन व्यवहारातच फसवणुकीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. ग्राहकांनी केलेल्या अत्यंत लहान चुका चोरट्यांच्या पथ्यावर पडतात.

ओटीपीने व्यवहार करा :

कोणत्याही वेबसाइट किंवा ॲपवरून ऑनलाइन खरेदी करता, तेव्हा हॅकर्स तुमचे डेबिट- क्रेडिट कार्ड नंबर, यूपीआय आयडी आदींचे जतन करून ठेवतात. त्यामुळे याचा वापर करताना सावध राहा, असे व्यवहार करताना नेहमी ओटीपीचा पर्याय निवडा.

कुठेही व्यवहार करणे टाळा:

अनेक जण ऑफिस किंवा सायबर कॅफे आदी ठिकाणी नेट बँकिंगसाठी लॉग इन करतात. अनेक जण ऑफिसचा लॅपटॉप किया कॉम्प्युटरवरूनही खरेदी करतात. ही सवय टाळा.

आमिष देणारे कॉल टाळा:

फसवणूक करणारे अनेकदा कर्ज, केवायसी किवा कोणत्याही लॉटरीच्या नावाखाली कॉल करून आमिष देतात, त्यांच्या जाळ्यात अनेक जण अडकतात. त्यांची लाखो रुपयांची फसवणूक होते. अशा कॉलर्सना बळी पडू नका.

अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका :

जर घरी बसून बँक खाते उघडायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर जाये. तिथे तुम्हाला अकाउंट ऑप्शनमध्ये ‘Apply Now’ आणि नंतर ‘Open An Account Instantly असे पर्याय दिसतात. त्यावर माहिती भरून खाते उघडता येते, परंतु यासाठी अनोळखी व्यक्ती किंवा बँकेचा एजंट म्हणून बतावणी करणाऱ्यावर विसंबून राहू नका.

तत्काळ तक्रार करा ऑनलाइन बैंकिंग करताना फसवणूक झाल्याचे आढळल्यास संबंधित बँकेच्या अधिकाऱ्याकडे तत्काळ तक्रार करा. तसेच जवळचे पोलिस ठाणे आणि सायबर क्राइम विभागात तक्रार द्या.

Scroll to Top