S R Dalvi (I) Foundation

‘महाविद्यालयातील प्राध्यापक’ कसे होता येईल? जाणून घ्या सविस्तर

Topic : How to become a ‘College Professor’? Learn more

अध्यापन हा एक उदात्त असा व्यवसाय मानला जातो. अध्यापनाबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये सर्वोच्च पद हे प्राध्यापकाचे आहे. आणि त्यामुळेच एका प्राध्यापकाचा जगभर आदर केला जातो. आइन्स्टाईन, स्टीफन हॉकिंगसारखे महान शास्त्रज्ञही याच व्यवसायाशी निगडीत होते. तुम्हालाही अभ्यासाची आवड असेल, इतरांना शिकवण्याची आवड असेल आणि तुम्ही ही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करण्याच्या विचारात असाल तर आजची माहिती तुमच्यासाठीच आहे. प्राध्यापक होण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या विषयाचा अभ्यास करत आहात त्यामध्ये प्रगत अभ्यास करून तुम्ही प्राध्यापक होऊ शकता.त्यासाठी काय करावे लागेल ते वाचा.
प्रथम बारावी पास व्हा.बारावीनंतर तुम्ही पदवीला प्रवेश घ्या ग्रॅज्युएशन हा उच्च शिक्षणाचा पाया असल्याचे म्हटले जाते. तिसर्‍या वर्षाच्या शेवटी, आपण हे ठरवावे की आपण तुम्हाला कोणता विषय सर्वात जास्त आवडतो? जेणेकरून तुम्ही पुढेही तेच चालूठेऊ शकाल.टीप: विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना पदवीमध्ये कला शाखेची परीक्षा घेण्याची सुविधा आहे. पण या वेळेपर्यंत प्राध्यापक व्हायचे ठरवले असेल तर त्यामध्ये बदल करू नका.

प्राध्यापक होण्यासाठी पदव्युत्तर शिक्षणात किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे. यामध्ये आरक्षित प्रवर्गासाठी ५% सूट आहे.
पुढील पायरी म्हणजे UGC NET परीक्षा उत्तीर्ण करणे.
ही परीक्षा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षातही देऊ शकता. सायन्सच्या विद्यार्थ्यांना CSIR UGC NET परीक्षेत बसावे लागते.
एकदा तुम्ही UGC NET/CSIR पास केल्यानंतर तुम्ही देशभरातील महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करू शकता.
SLET/SET परीक्षा द्या
ही परीक्षा राज्यस्तरावर दिली जाते. SLET परीक्षेचे पूर्ण स्वरूप राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आहे.तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता.

Scroll to Top