S R Dalvi (I) Foundation

शिक्षक शिक्षण का गरजेचे आहे?

Why is it essential to educate teachers?

शिक्षक प्रशिक्षण व शिक्षक शिक्षण  या मध्ये फरक आहे तरीही या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधीत आहेत . शिक्षकी पेशास आवश्यक असलेले अध्यापन कौशल्य विकसित करणारे प्रशिक्षण म्हणजे शिक्षक प्रशिक्षण होय आणि व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक, मानसिक व बौद्धिक गुणांची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षक शिक्षण. 

१) समाजापेक्षा शिक्षण गतिमान व शिक्षणापेक्षा शिक्षक गतिमान होण्यासाठी शिक्षक शिक्षण गरजेचे आहे .

२)ज्ञानाच्या प्रस्फोटामुळे दररोज नवनवीन ज्ञान,तंत्रे,पद्धतींची निर्मिती होत आहे म्हणून शिक्षकाला अद्यावत सर्व माहिती मिळवण्यासाठी शिक्षक शिक्षणाची गरज आहे .

३) आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये पूर्वीपेक्षा शिक्षकांचे कार्य वाढलेले दिसून येत आहे. ज्ञानाची वाढती गरज पाहता प्रत्येक क्षणी चांगल्या मार्गदर्शनाची गरज वाढत आहे .

४) डिजिटल शिक्षणाच्या वाढत्या गरजेमुळे शिक्षकांना माहिती तंत्रज्ञानाचे  महत्व समजून घेणे गरजेचे आहे .

५) प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर कसा करावा हे समजण्यासाठी शिक्षक शिक्षण गरजेचे आहे .

६) अभ्यासक्रम पूर्ण करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर देणे हे शिक्षक शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

७) शिक्षकांना शिक्षणातील नवविचार, प्रवाह , नवीन ज्ञान, संबोध या बाबत ज्ञान मिळते.

८) शिक्षक शिक्षण शिक्षकांना सवतःचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यास प्रवृत्त करते.

९)  शिक्षकांनमध्ये प्रायोगिक  व संशोधन वृत्तीचा विकास हा शिक्षक शिक्षणामुळे होतो .

१०) विद्यार्थ्यांची आकलनक्षमता ,दृष्टिकोन, अभिरुची,आणि कौशल्य विकसित करण्याची क्षमता शिक्षक शिक्षणामुळे विकसित होते.  

वरील मुद्द्यांवरून आपल्याला हे समजते कि शिक्षक शिक्षण हि काळाची गरज आहे . बदलत्या काळानुसार स्वःताला विकसित करणे हे शिक्षकांसाठी फार महत्वाचे आहे .

Scroll to Top