S R Dalvi (I) Foundation

स्वस्त MBBS चा युक्रेन पॅटर्न अभ्यास करुन त्यानुसार बदल करणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची माहिती 

Topic: In Ukraine study the pattern of cheap MBBS and make changes accordingly, informed the Minister of Medical Education

रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine war) युद्ध झाल्यानंतर भारतातील असंख्य विद्यार्थी युक्रेनमध्ये MBBS च्या शिक्षणासाठी (MBBS Education) गेले असल्याची माहिती  पुढे आली आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार तब्बल २० हजार भारतीय विद्यार्थी यूक्रेनमध्ये असल्याचे समजले आहे.  युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण हे (Medical Education) भारताच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आणि दर्जेदार असल्याची माहिती यानंतर समोर आली. त्यामुळे आता  वैद्यकीय शिक्षणमंत्री  अमित देशमुख यांनी मंगळवारी सांगितले यावर भाष्य करत ‘महाराष्ट्र सरकारने युक्रेन आणि रशियामधील वैद्यकीय शिक्षणाच्या फी रचनेचा विचार केला असून राज्यातील विद्यार्थ्यांना अशा सुविधा देता येतील का, हे पाहण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत’. अशी माहिती दिली आहे.
शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारणांचा राज्य सरकार अभ्यास करणार असल्याचे राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. देशमुख म्हणाले, “रशिया आणि युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्काची सरकारने दखल घेतली आहे. हे विद्यार्थी परदेशात का जात आहेत याचा आम्ही अभ्यास करू.”असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.तसेच ‘परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना याठिकाणी सुविधा मिळाव्यात यासाठी काही काम करण्याची गरज आहे, असे सांगून ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारे यासाठी एकत्र काम करू शकतात’.
भारतातील खाजगी संस्थांमध्ये एमबीबीएसच्या अभ्यासासाठी दरवर्षी 10 ते 12 लाख रुपये आकारले जातात. सुमारे 5 वर्षांच्या एमबीबीएसच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना 50 ते 60 लाख रुपयांपर्यंत फी भरावी लागते, तर युक्रेनमध्ये असे नाही. युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या अभ्यासासाठी वार्षिक ४ ते ५ लाख रुपये लागतात. म्हणजेच 5 वर्षे अभ्यास पूर्ण करण्याचा एकूण खर्च भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे.

Scroll to Top