S R Dalvi (I) Foundation

नवीन वर्षात शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे वय निश्चित…

Topic: Nursery age of students in schools is fixed

नर्सरीमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुलांच्या वयाच्या संदर्भात सुरू असलेल्या वादाला अखेर सरकारने पूर्णविराम दिला आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळेत प्रवेश घेण्यासाठी मुलांचे किमान वय किती असावे याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सुधारित परिपत्रक जारी केले आहे.सुधारित परिपत्रकानुसार प्लेग्रुप नर्सरी आणि पहिलीत प्रवेश घेताना 31 डिसेंबर 2022 पर्यंतचे आरटीई तसंच नवी वर्षात शाळांमध्ये प्रवेशाचं वय निश्चित करण्यात आलं आहे. 
यानुसार प्ले ग्रुप, नर्सरीसाठी वयोगट 4 वर्षे 5 महिने, जूनियर केजीसाठी 5 वर्षे 5 महिने, सीनियरसाठी 6 वर्षे 5 महिने आणि प्रथम श्रेणीसाठी 7 वर्षे 5 महिने असेल. यापूर्वी प्ले ग्रुप, नर्सरीसाठी वयोगट ३ वर्षे, जूनियर केजीसाठी ४ वर्षे, सीनियरसाठी ५ वर्षे आणि प्रथमसाठी ६ वर्षे अशी वयोमर्यादा होती. ते आता बदलले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे वयाच्या आधारावर शाळांना पूर्व प्राथमिकमध्ये प्रवेश नाकारला जाणार नाही.

Scroll to Top