S R Dalvi (I) Foundation

मसाल्याच्या व्यापाराचं केंद्र असलेलं भारतातलं ‘हे’ बंदर अचानक नकाशावरून गायब झालं…

India's the center of the spice trade, suddenly disappeared from the map...

दक्षिण भारतातील मुझिरिस हे वैभवशाली बंदर पुरातत्वशास्त्रज्ञांसाठी आजही रहस्यच आहे. तत्कालीन जगातील सागरी वाहतूक व आनुषंगिक व्यापार-उदिमाचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून या बंदराची ओळख होती.

रोमन लेखक प्लिनी द एल्डर यांनी ‘भारताची पहिली बाजारपेठ’ म्हणून या शहराचा उल्लेख केलाय.

या बंदरातून मसाले, रत्न, हस्तिदंत आणि रेशमाचा व्यापार चालायचा.

पण व्यापारासाठी प्रसिद्ध असलेलं मुझिरिस बंदर 14 व्या शतकात गूढरित्या नामशेष झालं. या लुप्त झालेल्या शहराच्या स्थानावरून आजही इतिहास संशोधक, पुरातत्त्व अभ्यासकांमध्ये एकमत दिसत नाही. पण पुरातत्व खाणाखुणा या शहराच्या अस्तित्वाविषयी काही सांगू शकतील का?

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील या बंदरातून पूर्वेकडील देशांसोबत मसाल्याचा व्यापार चालायचा. पण 14 व्या शतकात हे व्यापारी बंदर गूढरित्या नामशेष झालं.

जगातील सर्वात प्रभावशाली व्यापारी मार्गांपैकी एक असलेल्या या बंदराचा उल्लेख 2000 वर्ष जुन्या तमिळ संगम साहित्यात देखील आढळतो. मिसुरीचे हे बंदर दक्षिण भारत आणि पर्शिया, मध्य पूर्व उत्तर आफ्रिका आणि भूमध्य समुद्रातील रोमन साम्राज्य यांच्यातील परस्परसंवादाचे केंद्र होतं.

दुसऱ्या शतकात तयार करण्यात आलेल्या रोमन साम्राज्याच्या नकाशातही मुझिरिस दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे हे बंदर वास्तवात होतं आणि या ठिकाणी रोमनांची जहाजं येत असल्याचं निश्चित होतं, असं केरळा कौन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्चचे अध्यक्ष डॉ. पी. के. मायकल थारकन यांनी सांगितलं.

“रोमन मिरीच्या शोधात इथे आले होते. त्याकाळी पाश्चिमात्त्यांसाठी मिरी ही सोन्याइतकी मौल्यवान होती. त्यामुळे मिरीला ‘ब्लॅक गोल्ड’ देखील म्हटलं जायचं,” असं डॉ. थारकन यांनी म्हटलं.

पाश्चिमात्यांसाठी मिरी गरजेचा पदार्थ होता. त्यामुळे हे व्यापारी मिरी खरेदी करण्यासाठी कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी कोणतेही धोके पत्करण्यासाठी तयार होते.

हे बंदर दक्षिण भारत आणि पर्शिया, मध्य पूर्व उत्तर आफ्रिका आणि भूमध्य समुद्रातील रोमन साम्राज्य यांच्यातील परस्परसंवादाचे केंद्र होतं. पण 14 व्या शतकात हे व्यापारी बंदर गूढरित्या नामशेष झालं.

रोमन लेखक प्लिनी द एल्डर यांनी “भारताची पहिली बाजारपेठ” म्हणून या बंदराचा उल्लेख केलाय. या बंदरातून मसाले, रत्न, हस्तिदंत आणि रेशमाचा व्यापार चालायचा.

पण व्यापारासाठी प्रसिद्ध असलेलं मुझिरिस बंदर 14 व्या शतकात गूढरित्या नामशेष झालं. काही इतिहास संशोधकांच्या मते, रोमन संस्कृतीच्या अस्तामुळे हे शहर देखील नकाशावरून विलुप्त झाले. काही इतिहासकारांच्या मते, 1341 मध्ये पेरियार नदीला आलेल्या महापुरामुळे हे शहर उध्वस्त झालं.

पण आजही मुझिरिसच्या खर्‍या स्थानावर मोठा वाद आहे.

‘2006 – 2007 साली दक्षिणेकडील काही भागांमध्ये उत्खनन सुरू झालं. यात पट्टणममध्ये झालेल्या उत्खननात अशा काही गोष्टी सापडल्या ज्यामुळे भूमध्यसागरीय आणि युरोपीय देशांशी मजबूत व्यापारी संबंध उघडकीस आले. आणि यातूनच मुझिरिस बंदराचा शोध लागला,’ असं डॉ. बेनी कुरिकोस यांनी सांगितलं. ते आर्किटेक्ट आहेत.

“पट्टणम उत्खननात मी 12 सीझन संचालक म्हणून काम केलंय. या उत्खननात आम्हाला मोठ्या प्रमाणात बहुसांस्कृतिक असे पुरावे सापडले,” असं डॉ. पी.जे.चेरियन यांनी म्हटलं.

“हे पुरावे आशिया, युरोप आणि आफ्रिकेतील जवळपास 37 संस्कृतींशी साधर्म्य सांगणारे होते. इथे 93 सेंटिमीटर उत्खननात आम्हाला जगभरातील नेक गोष्टी सापडल्या. आम्ही कार्बन डेटिंगसाठी नमुने निवडले आहेत. परंतु स्ट्रॅटिग्राफिक आणि टायपोलॉजिकल पुराव्यांवरून आम्हाला वाटतं की, मुझिरिस वैभवाच्या अत्युच्च शिखरावर असतानाचे हे पुरावे असावेत,” असं डॉ. चेरियन यांनी म्हटलं.

पट्टणमच्या उत्खननात सोन्याच्या दागिन्यांपासून ते काचेचे मणी, चेरा नाणी अशा अनेक आकर्षक वस्तू सापडल्या आहेत.

2020 मध्ये पट्टणम साइटवर उत्खनन सुरू असताना एक दुर्मिळ रोमन स्फिंक्स सील रिंग सापडली होती. रोमन सम्राट होण्यापूर्वी ऑगस्टस सीझरच्या हातात देखील अशीच अंगठी होती.

ज्या गोष्टी तुम्हाला जगभरात कुठे मिळत नाहीत त्या गोष्टी तुम्हाला पट्टणमसारख्या छोट्या गावात मिळतात. याचा अर्थ काय? पट्टणम हा देखील मुझिरिस शहराचा अविभाज्य भाग होता. आजच्या मॉडर्न न्यूयॉर्क किंवा मॉडर्न शांघाय, मुंबई शहरासारखं हे शहर असू शकतं, असं डॉ. चेरियन यांनी म्हटलं.

पण मुझिरिसच्या नेमक्या स्थानावरून काही इतिहासकारांमध्ये मतभेद दिसून येतात.

आता तर पट्टणम, मुझिरीस आहे की मुझिरीस पट्टणम आहे हा वाद सुरू झालाय. ऐतिहासिक नोंदी पाहता मुझिरीस हे क्षेत्र खूप मोठं आहे, असं डॉ. बेनी कुरिकोस यांनी म्हटलं.

“त्यामुळे पेरियार नदीच्या दोन्ही बाजूंना व्यापणारा संपूर्ण परिसर मूळ मुझिरीसचा भाग असू शकतो असं मला वाटतं. आणि माझा ठाम विश्वास आहे की, अजून खूप इतिहास जमिनीखाली गाडला गेलाय.”

मुझिरीसचे मध्यपूर्वेतील अनेक प्राचीन संस्कृतींशी व्यापारी संबंध होते. त्यानंतर पोर्तुगीज, डच वसाहतवादी लोक शोध घेत घेत इथवर पोहोचले असावेत. त्यामुळे आपल्याकडे व्यापाराचा मोठा इतिहास आहे, असं मुझिरिस हेरिटेज प्रोजेक्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मनोज किणी यांनी म्हटलं.

14 व्या शतकात मुझिरीस अचानक विलुप्त झाले, पण त्यानंतर कोची हे बंदर व्यापाराचं प्रमुख केंद्र म्हणून उदयाला आले. आजही कोची आणि मुझिरीस यांचा जवळचा संबंध आहे.

2012 मध्ये कोचीमध्ये कोची- मुझिरिस बिएनाले इंटरनॅशनल आर्ट फेस्टिव्हल भरविण्यात आला होता. आधुनिक कॉस्मोपॉलिटन कोची आणि जागतिक संस्कृतीचे केंद्र म्हणून ख्यातनाम असलेलं मुझिरीसची संस्कृती एकत्र आणणे हा या फेस्टिव्हलचा उद्देश होता.

कोची

“कोची आणि मुझिरिसने नेहमीच वेगवेगळ्या संस्कृती आपल्याशा केल्या. आणि केवळ संस्कृतीच नाही, व्यापारी संबंधच नाही तर धार्मिक घटकही आपल्यात सामावून घेतले. मी म्हणेन, हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. आपण या भूमीत आपण धर्मनिरपेक्ष राहू शकतो. या फेस्टीव्हल मध्ये जगभरातून कलाकार येत असतात. त्यामुळे हे फेस्टीव्हल त्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावताना दिसते,” असं कोची बिएनालेचे अध्यक्ष आणि संचालक बोस क्रिष्णाम्माचारी यांनी म्हटलं.

“मुझिरिस आमच्यासाठी आईच्या ठिकाणी आहे. मुझिरिस आणि कोची यांच्यात एक नाळ जोडलेली आहे.”

मुझिरीसच्या नेमक्या स्थानावर वाद आहेत. मात्र पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होतं की, भारतातील या ठिकाणी जगभरातील अनेक संस्कृत्यांचा मिलाफ आहे. इथे अनेक शतकांपासून वस्तू आणि कल्पनांची देवाणघेवाण झाली.

आणि भारतातील ही पहिली बाजारपेठ आज नकाशावरून नामशेष जरी झाली असेल तर त्याचा वारसा आजही दिसून येतो.

Scroll to Top