S R Dalvi (I) Foundation

मुंबईतील शाळेंचे नाव मराठी भाषेत लिहिणे बंधनकारक, बीएमसीने जारी केला आदेश

Topic: Mandatory to write the names of schools in Mumbai in Marathi, an order issued by BMC

सर्वात मोठी महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरातील शाळांना त्यांची नावे मराठीत लिहिण्याचे आदेश दिले आहेत. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, मराठीत नाव लिहिलेले फलक सहज दिसतील अशा ठिकाणी लावावेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शिक्षणाधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार शाळांना त्यांच्या शाळेचे नाव मराठीत लिहावे लागणार आहे.मुंबई, महाराष्ट्रातील बीएमसी शिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी करून त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व शाळांना शाळेच्या बाहेर 8×3 फूट आकाराच्या साइनबोर्डवर मराठी देवनगरी लिपीत शाळांची नावे लिहिण्यास सांगितले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करून ही माहिती दिली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांगितले की, राज्य सरकार ‘अधिकृत मराठी’ सुलभीकरणावर काम करत आहे कारण अधिकृत मराठी काही वेळा समजण्यापलीकडे असते.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्राच्या पायाभरणी प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कारभारात मराठीचा वापर करण्यास उत्सुक होते. मुंबईला त्यांच्या राज्याची राजधानी करण्यासाठी महाराष्ट्रीयनांना ‘लढा आणि रक्त वहावे’ लागले आहे. ते पुढे असेही म्हणाले की, जे इतिहास विसरतात त्यांना भविष्य नसते.
इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे. मला इतर भाषांचा द्वेष नाही, पण मराठीचा अपमान मी सहन करणार नाही. इतर भाषांचा द्वेष करण्याची गरज नाही, परंतु इतर भाषांचे अतिक्रमणही करू नये. असे ही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच राज्यातील शाळांमध्ये मराठीचा अभ्यास सक्तीचा करणे किंवा दुकाने आणि व्यावसायिकांना मराठीत पाट्या लावणे बंधनकारक करणे म्हणजे अत्याचार होत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णायाबद्दल तुम्हाला काय वाटते? आम्हाला कमेंट मध्ये लिहून कळवा.

Scroll to Top