S R Dalvi (I) Foundation

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’

'NAMO Shetkari Maha Sanman Fund Scheme'

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यापैकी 75% लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांची आर्थिक स्थिती केवळ शेतीवर अवलंबून आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्याचे नाव आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. या योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी 6000/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेच्या शुभारंभाची घोषणा मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना केली आहे. नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील 1.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांना ‘पीएम किसान सन्मान निधी’ या योजनेअंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये देत आहे.

यासाठी दर 4 महिन्यांनी 2 हजारांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारनं गेल्या अधिवेशनात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना राबवण्याचं जाहीर केलं.

त्यात केंद्र सरकारच्या 6 हजार रुपयांमध्ये आणखी 6 हजार रुपयांची भर घालण्यात आली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील, असं सांगण्यात आलं. पण, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता नव्हती.

 या योजनेचा लाभ कुणाला मिळणार?

प्रातिनिधिक फोटो

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकार जेवढे पैसे या लाभार्थ्यांना देतं, तितकेच राज्य सरकारही देणार आहे.

योजना कधीपासून व कशी लागू होणार?

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी जारी करण्यात आला. या योजनेच्या कार्यपद्धतीनुसार, पुढचा हप्ता एप्रिल ते जुलै 2023 दरम्यान जारी केला जाईल. आता केंद्राच्या पुढील हप्त्यातच राज्य सरकार त्यांच्या वाट्याची रक्कम टाकून शेतकऱ्यांना देणार, की वेगळी काही कार्यपद्धती अवलंबणार, हे मात्र या योजनेचा शासन निर्णय आल्यावरच स्पष्ट होईल.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं?

पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

राज्यात असे 12 लाख शेतकरी असे आहेत, ज्यांचं बँक खातं अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाहीये. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ताबडतोड त्यांचं बँक खातं (ज्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे येतात) आधार नंबर आणि फोन नंबरशी लिंक करून घ्यावं. नाहीतर त्यांना राज्य सरकारच्या योजनेचे पैसे मिळण्यास अडथळे येऊ शकतात.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023 अंतर्गत फायदे आणि वैशिष्ट्ये

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेसारखीच एक योजना आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला महाराष्ट्र सरकारकडून वर्षाला 6000/- रुपयांची मदत दिली जाणार आहे.

ही आर्थिक मदत रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर पाठवली जाईल.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वर्षाला 12000/- रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. यातील 50% महाराष्ट्र सरकार आणि बाकी 50% केंद्र सरकार देणार आहे.

या दोन्ही योजनांद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा एक हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिला जाईल.

दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000/- रुपये जमा होतील.

याशिवाय शेतकऱ्यांचा विम्याचा हप्ताही महाराष्ट्र सरकार भरणार आहे.

राज्यातील 1.5 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे

दरवर्षी 6900 कोटी रुपये या योजनेसाठी सरकार खर्च करणार आहे.

या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळून ते स्वावलंबी होणार आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने अंतर्गत पात्रता

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.

या योजनेअंतर्गत फक्त राज्यातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र असतील.

शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी.

अर्जदार शेतकरी महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

अर्जदाराचे बँक खाते असणे अनिवार्य आहे जे आधार कार्डशी जोडलेले असावे.

Scroll to Top