S R Dalvi (I) Foundation

पाऊस आणि पर्यावरण ..

Rainfall and the environment…

उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी ते मे या महिन्यात असतो. होळी हा सण येऊन गेला की हळू हळू उन्हाळा ऋतू आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या चार महिन्याच्या थंडीनंतर येणारा उन्हाळा हा ऋतू जसं जसा पुढे जात राहतो तसतसे आपल्याला वातावरणात उष्णता जाणवू लागते.
उन्हामूळे कंटाळलेला प्रत्तेक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो .

जुन, जुलै , ऑगस्ट आणि सप्टेंबर हे आपल्या भारतातील पावसाळा ऋतूचे चार महिने आहेत . एप्रिल,मे मध्ये वळिवाचा पाऊस पडतो . मे महिन्याच्या कडक उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर जूनमध्ये पावसाळा सुरुवात होतो .
अलीकडील काही वर्षांत जून महिन्यात सुद्धा पाऊस पडत नाही, मग आपली चर्चा सुरु होते.
” अरे देवा, जूनमध्ये सुद्धा किती गरम होतंय .जून निम्मा संपत आला तरी पावसाचा थेंब नाही .”

मग आठवण होते आपल्याला पर्यावरण जपण्याची . मग आठवण होते ,”झाड लावली पाहिजेत , प्रदूषण टाळलं पाहिजे .”
परंतु एकदा का जूनच्या शेवटी पावसाला रीतसर सुरुवात झाली की,आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेले संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो .

आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून (निसर्गातून) होत असते हे आपल्याला माहिती असूनसुद्धा पर्यावरण संवर्धनाकरीता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट पर्यावरणामध्ये उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थीवृत्तीमुळे पर्यावरणाचे संतूलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरुकता न झाल्यास येणार्‍या काळात गंभीर समस्यांना समोरे जावे लागेल यामध्ये कोणतेही दुमत नाही.

मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धीमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे. हे विसरता कामा नये नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामूळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे. हे आपण ओळखले पाहिजे. व पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा! जीवन वाचवा! देश वाचवा! या उक्ती प्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे.

पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो.जगात अशी काही ठिकाण आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही . पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल याचा विचार करूनच भयंकर वाटतं . अशी वेळ जर का आपल्यावर यायला नको असेल तर पर्यावरण संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे .

Scroll to Top