S R Dalvi (I) Foundation

शाळेबद्दल, थोडसं मनातलं….

A few thoughts on school….

दादा म्हणाले, अरे मुलांनो आता तुम्ही मुंबईला जाणार ना?
या वर्षी शाळा नियमित चालू होणार आहे. हे ऐकून मुले आनंदाने नाचू लागली.

13 जुन म्हणजे शाळेचा पहिला दिवस.

दादांचे वाक्य कानी पडले आणि मी मात्र विचारांमध्ये हरवून गेलो.
मी इतका मोठा होऊनही माझी शाळा विसरलो नाही, शाळेतल्या आठवणी विसरणे तसे अशक्यच असते.

गेल्या काही वर्षात कोरोना हा आजार आला .सगळं जग तर थांबलंच पण या कोरोनाने मुलांचे जग म्हणजे शाळा ही बंद झालया . जवळपास गेली दीड वर्ष मुले शाळेत गेली नाही.
ऑनलाईन अभ्यास करणे सोईस्कर होते पण शाळेतली खरी धमाल ऑनलाईन नव्हती.
शाळा म्हणजे मित्र मैत्रिणी, शिक्षक, बाक,फळ्यावर रोज लिहिले जाणारे सुविचार,रोजची नियमित घेतली जाणारी प्रार्थना,कविता,धडे,घरचा अभ्यास ,शिक्षकांचा मार,मधली सुट्टी, शाबासकी, या सगळ्यात शाळेचे सहा ते सात कुठे निघून जायचे समजायचे नाही.
कोरोणा काळात हे सगळं मुलांपासून दूर झाले .
उन्हाळ्याची सुट्टी संपवून परत मुंबईला जायचे ते शाळा सुरू होण्याआधीच, हा नियम मी लहान असल्यापासून सुरू होता तो आतापर्यंत.

शाळेत जाणे म्हणजे पुन्हा एकदा बॅग आणि डब्याची आवराआवर, गणवेश इस्त्री, बुटांची साफसफाई,छत्री, रेनकोट अशी एक ना अनेक कामे होतीच!
जुन महिन्यात शाळा सुरू झाली की नेमकी शाळेत जाताना हा पाऊस यायचा.पावसात भिजण्याचा आनंद काही वेगळाच असे. शाळेतल्या असंख्य आठवणींनी माझे मन भरून आले.

दीड वर्षानंतर पुन्हा सुरू होणाऱ्या या शाळेत तीच धमाल येईल ना? मुले मधल्या सुट्टीत दंगा करतील ना? एकमेकांच्या टिफीन मधला खाऊ वाटून खातील ना? कोरोना नंतर सुरू झालेली ही शाळा मुलांना पुन्हा पहिल्या सारखी जाणवेल ना?
असे कित्तेक प्रश्न आता मला पडले होते.
पण आता या ऑफलाईन शाळेची मुलांना पुन्हा एकदा सवय व्हायला हवी हे खरे.
शिक्षक आणि विद्यार्थी यांमधील प्रेमळ बंधामुळेच पुन्हा एकदा ही मुले शाळेत रुळणार आहेत आणि माझ्या सारखेच असंख्य आठवणींचा ठेवा त्यांच्या मनात साठवणार आहेत.

Scroll to Top