S R Dalvi (I) Foundation

आपल्या मार्गदर्शनाने, संस्काराने आणि शिक्षणाने शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊ मातेला मानाचा मुजरा

Rajmata Jijabai Shahaji Bhosale Jayanti

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Shivaji Maharaj ) मातोश्री जिजाबाई (Jijabai ) स्वराज्याचा रक्षक ज्यांनी जन्माला घातला आणि त्यांच्या अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडु पाजुन त्यांना सक्षम केले अशा राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान अख्खा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.आज जिजाऊ राजमाता यांची जयंती आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल अधिक माहिती. 

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक फार महत्वाची भूमिका बजावत असतात.  जिजाबाई या चांगल्या आई तर होत्याच पण त्याचबरोबा त्यांनी चांगले संस्कार, चांगले विचार, चांगले मार्गदर्शन आणि शिक्षण देण्याची पण जबाबदारी पार पाडली आहे. जिजामाता या माऊलीचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये सिंदखेड, बुलढाणा जिल्ह्यात झाला. जिजाऊमाता यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शन आणि शिक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. मराठा साम्राज्य स्थापन करण्यामध्ये जिजाबाई यांचे फार मोठे श्रेय आहे. छत्रपती शिवराय लहानाचे मोठे आपल्या आईच्या छत्रछायेखाली झाले. त्याची संपुर्ण जवाबदारी जिजामातेन स्वतः उचलली. त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार करून त्यांना घडवलं.

वीर माता जिजाबाई या छत्रपती शिवरायांच्या मातोश्री तसेच त्यांचे मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होत्या. त्यांचे संपूर्ण जीवन धैर्य आणि त्यागाने भरलेले होते. आयुष्यभर अडचणी आणि संकटांना तोंड देऊनही त्यांनी धीर सोडला नाही आणि ती मूल्ये आपल्या ‘शिव’ पुत्राला दिली, ज्यामुळे ते पुढे हिंदू समाजाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ बनले. जिजाबाई यादव या उच्च कुटुंबात जन्मलेल्या अपवादात्मक प्रतिभाशाली होत्या. जिजाबाई यादव घराण्यातील होत्या आणि त्यांचे वडील शक्तिशाली सरंजामदार होते. शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर पालकांचा मोठा प्रभाव होता. लहानपणापासूनच त्यांना त्या काळातील वातावरण आणि घटना चांगल्या प्रकारे समजल्या होत्या.शिवाजी महाराजांवर संस्कार करत असतांना त्यांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनिती देखील शिकवली. न्याय करतांना समान करावा आणि अपराध करणाऱ्याला कठोर शासन करतांना देखील तयार असावे हे संस्कार जिजामातेने महाराजांवर बिंबवले.

शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी जिजामातेन 17 जुन इ.स. 1674 ला रायगडाच्या पायथ्याशी पाचड गावी शेवटचा श्वास घेतला जसे काही त्यांना छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक होण्याचीच त्यांना प्रतिक्षा होती.

Scroll to Top