S R Dalvi (I) Foundation

ज्येष्ठ नेते आणि प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन

Topic:

Senior leader and professor n. D. Patil passed away

राज्याच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक (Professor) एन.डी.पाटील ( N. D. Patil) यांचं निधन (passed away) झालं आहे. ते 93 वर्षांचे होते.  कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.  वातावरणात बदल झाल्याने  एन.डी. पाटील यांना  थोडी कणकण वाटत होती म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. त्यांना काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण ही झाली होती. या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली.
सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) इथे एन डी पाटील यांचा जन्म झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील असे होते. संपूर्ण महाराष्ट्राला ते एन डी पाटील याच नावानं परिचित होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एनडींनी अर्थशास्त्रात एमए केल्यानंतर पुणे विद्यापीठातून एलएलबीची पदवी घेतली होती. त्यानंतर ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत होते. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. १९४८ साली शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला. 

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

  • शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
  • शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
  • शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
  • शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
  • सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
  • रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
  • रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

चेअरमन पद काळात 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.

एस आर दळवी फाउंडेशन कडून  एन.डी.पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

Scroll to Top