S R Dalvi (I) Foundation

मुलांचे संगोपन करताना मुलांना देखील आदर द्या

Respect Children While Raising Them

मुले चिकणमातीसारखी असतात, पालक त्यांना कसे आकार देऊ इच्छितात यावर अवलंबून असते. आपल्या मुलांचे नाव चांगले असावे आणि जीवनात यशस्वी व्हावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पालकांनी मुलांच्या चांगल्या संगोपनाकडे चांगले लक्ष दिले तरच हे शक्य आहे. चांगल्या संगोपनात अशा काही गोष्टी असतात ज्याकडे पालक दुर्लक्ष करतात आणि ते आहे मुलांना आदर देणे.

तुच्छ लेखू नका-
मुलांना त्यांच्या भाऊ बहिणीं समोर रागावू नये. कोणतेही कारण असो मुलाने काही गैरवर्तन केले असेल, खोटं बोलले असेल आपल्याला राग येणं साहजिक आहे परंतु काहीही झाले तरी त्याला लहान भाऊ बहिणी समोर तुच्छ लेखू नका. असं केल्यानं लहान भाऊ बहीण देखीलमोठ्या भावाला मान देणार नाही. ते देखील त्याची चेष्टा करतील.म्हणून असं करू नका.

रागावर नियंत्रण ठेवा-
समजा मुलाने काही तोडले आहे किंवा एखादी वस्तू गहाळ केली आहे. त्यासाठी आपण त्याच्या वर रागावू नका. मुलांना चारचौघात अपमानित करू नका. त्याला एकट्यात विचारा त्याचा वर राग न करता प्रेमाने एकट्यात विचारा.त्याचा कडून असं का घडले ते जाणून घ्या आणि प्रेमाने त्याला समजावून सांगा जेणे करून त्याच्या कडून अशी चूक पुन्हा होणार नाही. मारल्याने किंवा राग केल्याने त्याच्या कोवळ्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यात बंडखोरीची भावना वाढू शकते किंवा तो नैराश्याला वेढला जाऊ शकतो.

मुलाचे दोष दाखवू नका-
नेहमी मुलाला आळशी, वाईट असं बोलू नका.जेवढे आपण त्याच्या वर रागवालं किंवा त्याच्या उणीव दाखवाल तो चुकीच्या मार्गावर जाईल. बऱ्याच वेळा पालक नेहमी दुसऱ्यानं समोर मुलाच्या उणीव किंवा त्यातील कमतरता सांगतात. असं केल्याने त्याच्या मध्ये नकारात्मक विचार विकसित होतात. या उलट मुलांमधील गुणांना सर्वांना सांगा त्याचे कौतुक करा असं केल्यानं त्याच्या मध्ये सकारात्मक भाव येतील आणि त्याच्या मनात अधिक प्रशंसा मिळविण्यासाठीची भावना जागृत होते.

मुलाच्या इच्छेस मान द्या-
प्रत्येक मुलं दुसऱ्यापेक्षा वेगळं असत. प्रत्येकात काही गुण अवगुण असतात .प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळे कौशल्ये असतात.मुलाची आवड निवड वेगळी असते. मुलाला जे करण्याची आवड आहे ते त्याला करू द्या . त्याला त्याचे निर्णय घेऊ द्या. जेणे करून त्याच्या मनात गुदमरलेले, फ्रस्टेशन, तणाव, राग उद्भवणार नाही. त्याच्या मनात जिव्हाळा ,प्रेम आपुलकी आणि आनंदाचा संचार होईल.तो आपल्याला देखील प्रेम आणि मान देईल आणि इतरांना देखील मान देईल.

मुलाला टोपण नाव देऊ नका-
बऱ्याच वेळा पालक आपल्या मुलाला पिंकू,रिंकू, गोलू असं नाव देतात. चुकून देखील असं नाव देऊ नका. त्याला त्याच्या नावानेच हाक द्या. असं केल्याने त्याच्या मनात सकारात्मक ऊर्जा संचारते.

मुलाला आदरार्थी बोलावं-
काही चांगल्या कुटुंबाचे लोकं मुलांना आदरार्थी बोलतात. जसं की आपण आज कुठे गेला होतात. आपण काय करत आहात. असं केल्यानं मुलांमध्ये सभ्य आणि शिष्टताचे घडण होत. टोचून तू तडक किंवा उद्धटपणे बोलल्यावर त्यांच्या वर देखील असेच संस्कार येतात आणि ते देखील उद्धटपणे बोलू लागतात. या मुळे आपल्याला इतरांपुढे मान खाली घालावी लागू शकते.

Scroll to Top