S R Dalvi (I) Foundation

शाळा वाचवा # शिक्षण वाचवा

Save School # Save Education

20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अनेक ग्रामीण संघटना आणि शिक्षक संघटना विरोध करत आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने शून्य ते 20 श्रेणीत येणाऱ्या शाळांची चौकशी केली आहे. त्यामुळे राज्यातील कमी उत्तीर्ण संख्या असलेल्या शाळा लवकरच बंद होण्याची चिन्हे आहेत.

शाळा वाचवणे अतिशय गरजेचे आहे. शाळा जर बंद झाल्या तर बालमजुरी, बालविवाह यासारख्या सामाजिक समस्यांना मुलांना सामोरे जावे लागेल.
शिक्षण हक्क कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. पण 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा पूर्णपणे बंद झाल्या तर लाखो गरीब, वंचित मुले, बहुजन आणि शेतकऱ्यांची मुले आणि विशेषत: मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतील. कमी पटसंख्या असलेल्या बर्‍याच शाळांमध्ये लोकसंख्या असलेल्या भागापासून दूर असलेली ठिकाणे आहेत आणि त्यांना वाहतुकीचे कोणतेही पर्याय नाहीत. अशा वेळी या शाळा बंद पडल्यास येथे शिकणारे लाखो विद्यार्थी शाळाबाह्य होतील, अशी भीती आहे. मुलींचे गळतीचे प्रमाण आधीच जास्त असताना, या निर्णयामुळे त्यांना शाळेत यश मिळवणे आणखी कठीण होईल आणि इतर सामाजिक समस्या निर्माण होतील.

शिक्षण हा सर्व मनुष्यांचा पहिला आणि सर्वात महत्वाचा हक्क आहे.आपण शिक्षणाशिवाय अपूर्ण आहोत आणि आपले जीवन व्यर्थ आहे. शिक्षण आपल्या जीवनात एक ध्येय ठेवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. खाली दिलेल्या गोष्टीमध्ये जपान मधल्या एका मुलीच्या शिक्षणासाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला होता.

” जपान मध्ये ‘कामी-शिराताकी’ नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन जवळ जवळ बंदच आहे असं म्हणू शकतो. कारण ही जागा जपानमध्ये खूप दूरच्या भागात असल्याने इथे ये जा करणारे प्रवासी तसे कमीच, त्यामुळे जपान रेल्वेज या संपूर्ण रेल्वे लाईनला बंद करणार होती. पण तेवढ्यात त्यांना समजलं की ‘काना हाराडा’ नावाची एक लहान मुलगी या ट्रेनचा वापर रोज शाळेत जाण्यासाठी करते.

साहजिक आपल्याला एका प्रवाश्यामुळे काही फरक पडणार नाही. पण रेल्वे लाईन बंद झाल्याने मुलीची शाळा बंद पडेल हे जेव्हा जपान रेल्वेजच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी जो निर्णय घेतला तो कौतुक करण्याजोगा होता. त्यांनी असं ठरवलं की जोपर्यंत या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही रेल्वे बंद होणार नाही. आणि तेव्हा पासून केवळ एक प्रवासी असलेली ही ट्रेन धावत राहिली.एवढ्यावर न थांबता जपान रेल्वेजने मुलीच्या शाळेच्या वेळेनुसार रेल्वेचं टाईमटेबल तयार केलं. शाळेच्या वेळेनुसार ट्रेनची वेळ बदलत असायची. २०१६ साली काना हाराडाचं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं आणि तेव्हा पासून ही रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.

एखाद्या देशाच्या सरकारने केवळ एका मुलीच्या शिक्षणाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी ही गोष्ट खरंच महान आहे. आणि आपल्या देशात पटसंख्या कमी म्हणून शाळा बंद करतात….परदेशात नुसतं फिरायला जायचं नसतं तर तेथील संस्कृती, विचार अशा असंख्य गोष्टी आत्मसात करायच्या असतात…”

Scroll to Top