S R Dalvi (I) Foundation

यंदा राज्यातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या नाहीत !

Topic: Schools in the state do not have summer vacation this year

गेल्या दोन वर्षापासून राज्यसह संपूर्ण जगावर कोरोनाच्या (Corona)महमारीचे संकट घोंगावत होते. या दरम्यान राज्यात सर्व दुकाने, बाजारहाट पासून रेल्वे सेवा ही बंद ठेवण्यात आली होती. वाढणाऱ्या रुग्णानांच्या संख्येकडे बघता राज्यातील सर्व (Maharashtra School) शाळांचे दरवाजे ही तब्बल 2 वर्षांपेक्षा जास्त काळ बंद होते. अखेर काही महिन्यांपूर्वीच राज्याच्या शाळ पुन्हा एकदा सुरु करण्यात आलेले असून शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे आवाज घुमू लागले आहेत. साधारण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळांना उन्हाळ्याची सुट्टी (Summer Vacation)लागते. मात्र  आता शाळांच्या उन्हाळी सुट्टींबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांना मुकावं लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून येत्या मार्च आणि एप्रिल महिनाभर संपूर्ण उपस्थिती सह शाळा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
शालेय शिक्षण विभागाकडून यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. या परिपत्रकानुसार सुरु असलेल्या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.त्याचबरोबर तसेच एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सूरू ठेवण्यात याव्यात असेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा संपूर्ण मार्च आणि एप्रिल महिनाभर विद्यार्थ्यांची पूर्ण वेळ शाळा असणार आहे. एवढेच नाहीतर रविवारीही ऐच्छिक असल्यास शाळा सुरु ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी इंजॉय करता येणार नाही असच दिसत आहे. तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतोय का? कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत कळवा. 

Scroll to Top