S R Dalvi (I) Foundation

मुलींसाठी सरकारी योजना कोणत्या?

What are the government schemes for girls?

सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून पालक आपल्या मुलींचे भविष्य सुधारू शकतात आणि तणावमुक्त होऊ शकतात. मुलींसाठीच्या सरकारी योजनांची माहिती यावेळी घेऊ….

सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना अल्पबचत योजने अंतर्गत ठेवण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत, मुलीच्या जन्मापासून ते १० वर्षापर्यंत पालकांच्या वतीने गुंतवणूक केली जाते. सरकार सध्या या योजनेवर ७.६ टक्के रिटर्न देत आहे आणि यामध्ये किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये वार्षिक गुंतवणूक करता येते. जन्मापासून १८ वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते आणि मुलीच्या लग्नापर्यंत मोठी रक्कम जमा करता येते.

बालिका समृद्धी योजना
ही योजना सुकन्या समृद्धी योजनेसारखीच आहे, ज्यात मुलीच्या जन्मानंतर ५०० रुपये अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते. यामध्ये सरकारकडून गुंतवणुकीवर वार्षिक व्याज दिले जाते, जे मुलगी १८ वर्षांची झाल्यावरच काढता येते.

सीबीएसई उडान योजना
मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत सीबीएससी उडान योजना सुरु करण्यात आली. ही योजना मुलींसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षणाची सुविधा प्रदान करते. यासह त्यांना अभ्यास सामग्रीसह टॅब्लेटदेखील दिले जातात, जेणेकरून ते त्यांच्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी पूर्ण करू शकतील.

मुख्यमंत्री लाडली योजना
झारखंडने मुख्यमंत्री लाडली योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या नावावर ऑफिसच्या बचत खात्यात पाच वर्षांसाठी ६,००० रुपये जमा केले जातात.

माझी कन्या भाग्यश्री
महाराष्ट्र शासनामार्फत चालवल्या जाणाच्या या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावे राष्ट्रीय बँकेत संयुक्त खाते उघडले जाते आणि दोघींना १ लाख रुपयांचा अपघात विमा आणि ५,००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो.

कन्याश्री संकल्प योजना
पश्चिम बंगाल सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलीच्या शिक्षणासाठी मदत दिली जाते. १ हजार रुपये १३ ते १८ • वयोगटातील मुलींना दिले जातात. १८ वर्षे वयाच्या मुलीला २५ हजार रुपये दिले जातात.

Scroll to Top