S R Dalvi (I) Foundation

सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय?

What is a bridge course?

करोनाकाळात मागील शैक्षणिक वर्षात संपूर्ण शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने पार पडले. यामुळे अनेकांना पद्धतशीर शिक्षण मिळू शकले नाही तर, काहींना ऑनलाइनची सुविधा नसल्याने शिक्षण घेता आले नाही.कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांचा राहिलेला अभ्यास भरून काढणे हे शिक्षकांपुढील आव्हान होते. त्यासाठी ब्रीज कोर्स किंवा सेतू अभ्यासक्रम कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने सोमवारी २८ जून रोजी सेतू अभ्यासक्रम कार्यक्रमाचा शुभारंभ केला. करोना विषाणू महामारीमुळे राज्यातील सर्वच शाळांमध्ये शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू होते अशा वेळी मागच्या सत्रात विद्यार्थी कोणत्या क्षमतेत मागे पडलेले आहे हे शोधून त्या क्षमतांची तयारी करून घेणे, हा या सेतू अभ्यासक्रम किंवा ब्रीज कोर्सचा उद्देश आहे.

सेतू अभ्यासक्रम राबविण्याविषयक सविस्तर सर्व सूचना शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत. तसेच अधिक संबोध स्पष्ट ते करिता ई-साहित्याच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. १ जुलै २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी एकूण ४५ दिवसांकरिता करावयाची आहे. त्यानंतरच सद्याच्या इयत्तेचा अभ्यास सुरू करायचा आहे.

ब्रीज कोर्सची गरज काय?
गेल्या वर्षीपासून विद्यार्थी शाळेमध्ये आलेले नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्षभराच्या ऑनलाईन शिक्षणाच्या काळात किती कौशल्य विकसित केले आहेत. याची चाचणी ब्रीज कोर्समधून घेतली जाणार आहे.

ब्रीज कोर्समध्ये काय असणार?
एखादा विद्यार्थ्यी चौथीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार असेल तर त्याला शाळा सुरु झाल्यानंतर पहिले 45 दिवस तिसरीचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. यामध्ये सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाची उजळणी करुन घेतली जाईल. 45 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयावरील पेपर द्यावा लागेल . हा पेपर गेल्या वर्षीच्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यातून विद्यार्थ्यानं किती कौशल्य प्राप्त केली आहेत, याची चाचणी घेतली जाईल. ब्रीज कोर्स शाळा सुरु झाल्यानंतर राबवण्यात येणार आहे.

गणित विज्ञान विषयाला अधिक महत्व
ब्रीज कोर्समध्ये सर्व विषयांचे पेपर आयोजित केले जाणार असले तरी प्रामुख्यानं गणित आणि विज्ञान विषयावर अधिक भर असणार आहे. तर, सुरुवातीच्या ४५ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची ब्रीज कोर्सच्या माध्यमातून तयारी करुन घेतली जाणार आहे.

सर्व शाळांना बंधनकारक
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने ब्रीज कोर्स महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांना अनिवार्य केला आहे. महाराष्ट्रातील सीबीएसई आणि इतर बोर्डांच्या शाळांना हा निर्णय लागू नसेल. दुसरी ते आठवीच्या वर्गासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रीज कोर्समधून विद्यार्थ्यांची पुढील वर्गातील अभ्यासक्रम शिकण्याची क्षमता देखील जाणून घेतली जाणार आहे.

सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवसनिहाय कृतिपत्रिका (worksheets) देण्यात आल्या असून सदर कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित, कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत.विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकतील असे त्यांचे स्वरूप आहे. विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतिपत्रिका शिक्षक / पालक / शिक्षक मित्र / सहाध्यायी / स्वयंसेवक / विद्यार्थी मित्र यांच्या मदतीने सोडवाव्यात. या विषयनिहाय सर्व कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी स्वतंत्र वहीमध्ये किंवा शक्य असल्यास त्यांची छपाई ( print) करून त्यामध्येही सोडवू शकतात जेणेकरून शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापनासाठी त्यांचा उपयोग होईल.

सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक आहे. शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीनेसोडवून घेऊन त्या तपासाव्यात. या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.

Scroll to Top