When children are not disciplined even by hitting them and getting angry?
जेव्हाही मुलांना काही चांगलं शिकविण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा मुलं अजिबात ऐकत नाही. अशा वेळी आईवडील रागावतात आणि मुलं अजून जास्त त्रास देतात. लहान मुलं खोडकरपणा आणि मस्ती करण्यात गुंग असतात. लहानपणाच्या काही चुकीच्या सवयी मुलांच्या भविष्यावर गंभीर परिणाम करू शकतात. मुलं अजिबात ऐकत नसतील तर त्यांना शिस्त कशी लावायची, कसं नीट वागायला शिकवायचं हे मोठं चॅलेंज पालकांसमोर असतं.
रिव्हर्स काउंटडाउन :
जेव्हा मुलांना राग येतो, तेव्हा राग शांत करण्यासाठी त्यांना समजवा. त्यांना मारण्या किंवा ओरडण्यापेक्षा रिव्हर्स काउंटिंग म्हणजेच उलटी मोजणी करायला सांगा. २ ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना तुम्ही ही शिक्षा देऊ शकता. कारण, जेव्हा मुलं रागानं किंचाळतात, तेव्हा १० ते १ रिव्हर्स काउंटिंग करायला सांगितल्यानंतर ती शांत होतील आणि तुम्ही त्यांच्याशी बोलू शकाल. मुलांच्या रागवण्याचं कारण समजून घ्यायला हवे.
• लहान मुलं उगाचच चिडचिड करत असतील तर त्यांच्याशी शांततेनं बोला. प्रेमानं बोलल्यानं मुलांमध्ये एक वेगळा बदल दिसून येईल. यामुळे हळूहळू मुलं मनातलं तुमच्याशी शेअर करतील आणि त्यानंतर ते त्यांचा मुद्दा तुमच्यासमोर ठेवू लागतील, ज्यामुळे तुम्हाला त्यांना चांगले वागणूक शिकवण्यात मदत होईल.
• शिस्त शिकवताना मुलाला त्याच्या वागण्यात काय चूक आणि काय बरोबर आहे हे समजावून सांगणे आवश्यक आहे. परंतु, मुलांना काय चुकीचे आहे ते थेट सांगल्याने ते अधिक खोडकर बनतात किंवा तुमच्यावर रागावू शकतात. त्यासाठी जुन्या पद्धतीचा अवलंब करु नका. त्यांना त्यांची चूक सांगून मारहाण करणे किंवा शिवीगाळ करणे, यामुळे मुले खूप हट्टी होऊ शकतात. म्हणूनच मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी सौम्य संभाषण पद्धतीचा अवलंब करा.
• मुलाला समजावून सांगा की, त्याने केलेली चूक त्याच्यासाठी आणि त्याच्या सभोवतालच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे त्याचे नुकसान होऊ शकतं. पालक आणि शिक्षकांसमोर त्याची प्रतिमा खराब होऊ शकते किंवा भविष्यात त्याचे नुकसान होऊ शकतं. अशा प्रकारे बोलल्याने मुलाला तुमचा मुद्दा समजू शकतो आणि हट्टीपणा किंवा वाद होण्याची शक्यता राहणार नाही.