S R Dalvi (I) Foundation

लहान मुले त्रास देतात म्हणजे नेमकं काय?

why do kids give distress?

लहान मुले खूप त्रास देतात हा ल पालकांचा फार जुना आणि नित्याचा आक्रोश आहे. कधी हट्टीपणा करणे, कधी मोठमोठ्याने जोरजोरात रडणे, काही वेळा तर खूप वेळ रडण्याचे गाणे लावणे, उलट उत्तर देणे, सांगितलेले न ऐकणे, वाद घालणे आणि काही वेळेला चक्क हमरीतुमरीवर येणे अशा प्रकारच्या प्रासदायक होतील अशा कृती करून मुले आपल्या पालकांना त्रास देतात. सगळीच मुले. अशी नसली तरीही सर्वसाधारणपणे सर्वच मुले पालकांना कधी ना कधी त्रास देतात. त्यात काहींचा त्रास हा काही वेळापुरता किंवा दिवसांसाठी असतो. पण हा त्रास जर खूप वादत जायला लागला की मग पालक आपल्या मुलाविषयी खूप चिंताग्रस्त झाल्याचे आपल्या निदर्शनास येते. हा त्रास सातत्याने क्रमाने वाढत असेल किंवा सहन करण्याच्या पलीकडचा असेल तर त्यावर पालकांनी गांभीर्याने विचार व चिंतन करावयास हवे. मुलांचे असे वागणे ज्याला पालक त्रास म्हणतात त्यामागे काही कारणे दडलेली असतात. ती सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे- मुले त्रास कधी देतात ?

लहान वयात मुलांची झालेली अपुरी झोप, त्यांना जर भूक लागली किंवा खूप तहान लागली, त्यांना शारीरिक थकवा जाणवत असेल तर, त्यांचा नित्यनियमाच्या दिनक्रमात काही बिघाड झाला असेल तर, मुले आजारी असली तर त्यांना थोडे अस्वस्थ वाटते अशावेळी मुलांचा चिडचिडेपणा चाटतो. लहान वयात साधारणपणे सहा वर्षांपर्यंत मुलांमध्ये एक नैसर्गिक चंचलता असते. ते एका ठिकाणी स्वस्थ बसत नाहीत किंवा एका वस्तूसोबत जास्त वेळ खेळत नाहीत. त्यांना सतत काही तरी नवे हवे असते. बात घरातील वातावरणही खूप महत्त्वाची भूमिका घरातील मोठयांच्या बोलणे- वागण्याचे निरीक्षण आणि अनुकरण घरातील मोठ्यांचे एकमेकांशी बोलणे, वागणे याचे मुले निरीक्षण करतात आणि ते अनुकरण करण्याचा बजावते. आज मोबाइल हादेखील मुलांचे प्रयत्न करतात. आपले आई-वडील त्रास देण्यामागचे एक नवे कारण म्हणून पुढे येत आहे.

मुलाशी सुसंवाद साधावयास हवा
लहान मुलांकडून सतत नवीन वस्तू आणि त्याची मागणी होत असते. यावेळी पालकांची भूमिका फार महत्त्वाची असते. कारण मुलाची मागणी सतत पुरविण्याची भूमिका असेल तर मूल नेहमी हट्ट करण्याकडे झुकते. आपली मागणी पुरी होत आहे. या विचाराने त्याचे तसे वागणे हे स्वाभविक आहे. मात्र त्याच वेळी अति कडक शिस्तीचा बाणा दाखवीत मुलावर सतत रागाविल्यासदेखील मूल आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा मुलाचे वय, त्याची मागणी याचा सहसंबंध जाणून मुलाशी सुसंवाद साधावयास हवा.

एकमेकांसोबत कसे वागतात याचे निरीक्षण मुलांच्या वागण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. घरातील भाषा मुलांवर परिणाम करते आपल्या आजी-आजोबांसोबत कसा व्यवहार आहे, हेही मुले पाहतात. घरात पाहुणे आल्यावर किंवा आपण पाहुणे गेल्यावर कसे वागावे याचे संस्कार एका दिवसात देता येत नाहीत, त्याकरिता घरातील नित्याचे वातावरण यात काम करीत असते. कारण बरीच मुले ही कुणी पाहुणे आल्यावर किंवा पाहुणे म्हणून दुसन्यांकडे गेल्यावर अधिक त्रास देतात. यामागे घरातील मोठयांचे वागणे आणि घरातील संवाद जबाबदार असते. ज्या मुलांना पालक त्रासदायक म्हणून संबोधतात ती मुले पुढे शालेय स्तरावरदेखील असाच व्यवहार करताना दिसतात. जसे अभ्यास न करणे, शाळेतील तक्रारी घरापर्यंत येणे, मित्रांसोबत भांडणे इत्यादी

शिस्त एक कौटुंबिक संस्कार
मुलांना मुळात शिस्त लावणे हा असा काही उपचारच नसतो. तो एक कौटुंबिक संस्कार असतो. मुलांच्या प्रश्नाचा स्वीकार करणे, त्याच्यासोबत सतत बोलणे, त्याची मागणी किंवा हट्ट योग्य प्रकारे हाताळणे, पालक हे त्याला आपले प्रश्न आणि अडचण सोडवितात आणि मला मदत करतात असा विश्वास त्याच्या ठायी यायला हवा. त्यासोबत त्याला घराबारे समाजात, परिसरात, बाजारात सोबत नेणे, त्याला आपल्या कामात सहभागी करून घेणे, घरातील त्याला शक्य होतील अशी कामे निवडून ती पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविणे. यामुळे मुले व पालक यात सुसंवाद राहील. ज्या घरात पालक मुलांसोबत असतात तिथे मुलांचा त्रास कमी असतो. जिथे पालक केवळ पालक म्हणून आपले कर्तव्य बजावतात, मात्र मुलांचे मित्र होत नाहीत तिथे मुले स्वतःला असुरक्षित समजतात आणि ते अनेक माध्यमांतून पालकांचे लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न करतात, जो पालकांना त्रास वाटतो.

Scroll to Top