S R Dalvi (I) Foundation

इंटरनेट फ्रॉड म्हणजे काय?

What is internet fraud?

इंटरनेट फसवणूक म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती तुमची वैयक्तिक माहिती वापरते किंवा तुमच्या परवानगीशिवाय त्यांना पैसे किंवा दुसरे काहीतरी देण्यास तुमची फसवणूक करते. सर्व नवीन मोबाइल ॲप्स आणि ऑनलाइन व्यवहारांमुळे आजकाल ऑनलाइन चोरी आणि फसवणूक यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
जिथे पैसा आहे तिथे गुन्ह्याची शक्यता असते हे तत्व सायबर गुन्ह्यातही दिसून येते. कारण ई-शॉपिंग, ऑनलाइन बँकिंग, मोबाइल ॲप्सद्वारे खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून भरपूर पैसे हडप केले जाऊ शकतात.

तुमचा विश्वास नसलेल्या कोणालाही तुमचे बँक खाते किंवा क्रेडिट कार्ड पिन किंवा पासवर्ड देऊ नका. ग्राहकांना या सूचना देण्यासाठी बँका सायबर तज्ञ आणि कायद्याची अंमलबजावणी करत आहेत. तथापि, कॉलची पडताळणी न करता, बँकेच्या वतीने कॉल करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवून लोक त्यांची सुरक्षितता धोक्यात आणू शकतात.

बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्ड, इमेल याचा पिन वा पासवर्ड कोणालाही देऊ नये, असे वारंवार सांगण्यात येते. बँकांसह सायबरतज्ज्ञ, पोलिस यंत्रणा ही सूचना करत असतात. परंतु बँकेतून कॉल आल्याचे भासवणाऱ्या भामट्यांवर अतिविश्वास ठेवणे ग्राहकांना भोवते. लोकांचा अॅपवर, बँकेच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याने त्याची खातरजमा करण्याची तसदी घेतली जात नाही.

गुन्हेगारांकडे काही वेगळे, अद्ययावत वा नवीन तंत्रज्ञान नसते. परंतु ते मानवी कल लक्षात घेऊन सापळा रचतात. त्यातन इमेल, अॅप, लिंक, बोगस कॉल सेंटर वगैरे सापळे रचले जातात. त्या सापळ्यात अडकविण्याचे तंत्र मोडून काढण्यासाठी सर्वसामान्यांनी सतर्क रहावे.

बँकेमधून फोन आल्याचे भासवणाऱ्या भामट्याकडे आपल्या खात्याचा बऱ्यापैकी तपशील असतो. बँकांकडून पुरविल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डाच्या सुरुवातीचे काही क्रमांक सारखेच असतात. हे भामटे तेच क्रमांक सांगतात आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो. वेगवेगळ्या ऑफर वगैरेच्या नावाखाली मोबाइल क्रमांक घेतले जातात. यातून मोबाइलचा डेटा मोठ्या प्रमाणात जमा होऊन त्याची विक्री होते. म्हणूनच वेगवेगळ्या कंपन्या, बँकांच्या एजन्सीकडून सारखे फोन येतात.

बईकरांना उत्तर भारतातून लक्ष्य करणे, उत्तर भारतातील लोकांना मुंबईत बसून फसविणे असे प्रकार घडतात. या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोबाइलची मदत होते. मात्र पोलिस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी बोगस कागदपत्रांच्या आधारे खरेदी केलेल्या सिमकार्डचा वापर केला जातो. सीमकार्ड ज्याच्या नावे आहे त्याच्यापर्यंत पोलिस पोहोचतात. मात्र गुन्ह्यात त्याचा काहीच सहभाग नसतो. ऑनलाइनवरून फसवणूक करून आलेली रक्कम बँकेत वळती करण्यासाठी एखाद्या गरीब व्यक्तीस सोबत घेतले जाते. त्याच्या नावावर रक्कम वळती करून त्यास कमिशनपोटी काही रक्कम दिली जाते. या बँक खातेदारांपर्यंत पोलिस पोहोचतात परंतु सूत्रधार वेगळाच असतो.

लॉटरी लागल्याचा अचानक येणारा इमेल, विम्याची रक्कम, नोकरीची संधी, दामदुप्पट रक्कम आदी मोहाच्या सापळ्यात शेकडो जण अडकतात. अशी रक्कम आपल्याला का आणि कोण देणार याचा विचार केला जात नाही. त्यासाठी ओटीपीपासूनची माहिती लगेचच पुरविली जाते. नंतर मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

ई-व्यवहार काही सेकंद, मिनिटांचा असतो. देश वा परदेशातून केल्या जाणाऱ्या घोटाळ्याचा तपास करणे बऱ्याचदा अवघड ठरते. ऑनलाइन ठगांकडून ही रक्कम एटीएमवरुन काढून घेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे एकदा ही रक्कम काढली गेली की त्याचा तपास करणे अवघड ठरते.

केवळ ई-व्यवहार नाही तर, सोशल मीडियावर वावरताना विशेष काळजी घ्यावी. त्यावर लाइव्ह लोकेशन, खासगी माहिती, फोटो शेअर करू नयेत. गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन मॉर्फिंग आदी स्वरूपात महिलांना लक्ष्य करू शकतात. या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राजपूत यांनी केले.

Scroll to Top