S R Dalvi (I) Foundation

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस’ का साजरा केला जातो?

Why is ‘National Pollution Control Day’ celebrated?

वायू प्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण यामुळे आपले जीवन विस्कळीत होत आहे. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस (National Pollution Control Day 2023) दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

देशात अलीकडे दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) मध्ये प्रदुषणाची (Pollution) समस्या अधिक बिकट बनत आहे. प्रदूषण हा एक मोठा विषय आहे ज्याचा सामना भारतच नाही तर संपूर्ण जग करत आहे. मानवाबरोबरच त्याचा निसर्गावरही परिणाम होत आहे. वायू प्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण यामुळे आपले जीवन विस्कळीत होत आहे. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस (National Pollution Control Day 2023) दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे काय इतिहास आहे ते जाणून घेऊयात…

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस इतिहास –

1984 मध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेमुळे हजारो लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले, तर अनेकांना घरेही सोडावी लागली. हा दिवस लक्षात ठेवण्यासाठी आणि प्रदूषण थांबविण्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस महत्त्व –

प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, प्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की त्याचा परिणाम जगभर दिसून येतो. हवा, माती, ध्वनी प्रदूषण अशा विविध प्रकारच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या गोष्टींबद्दल लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचे महत्त्व आणि उद्देश आहे. आपण मोकळ्या हवेत श्वास घेतो आणि त्यामुळे आपण जगत असतो. म्हणून वाढत्या प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच प्रदुषण कमी झाल्याने पर्यावरणाचे रक्षणही होईल.

Scroll to Top