S R Dalvi (I) Foundation

अखेर शाळेची घंटा वाजणार की पुन्हा ब्रेक लागणार?

गेल्या बऱ्याच महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे अख्ख जग थांबले होते अस म्हणायला हरकत नाही. अवघ्या काही दिवसांसाठी लावण्यात आलेला लॉकडाउन बरेच महीने सुरु ठेवण्यात आला. या परिस्थितीचा परिणाम सगळ्याच स्तरावर झाला. राज्यातील शाळा ही बंद ठेवण्यात आल्या. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन स्कूलिंग चा पर्याय सरकार ने अमलात आणला. ऑनलाइन स्कूलिंग ही खऱ्या अर्थी शिक्षकांची कसोटी होती. मात्र त्यावर ही मात करत प्रत्येक शिक्षकाने आपापल्यापरीने  विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचे काम केले. राज्यात जसजशी कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली तसे लावण्यात आलेले निर्बंध ही उठवण्यात आले. अखेर काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता पुन्हा एकदा ओमिक्रॉन नावाचा कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंट सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी शाळा सुरु होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे.दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने  कार्यक्षेत्रातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी 15 दिवस लांबणीवर टाकला आहे. राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा आजपासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नाशिकमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. शाळा गेल्या दीड वर्षापासून बंद जरी असल्या तरीही लहान मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांमध्ये अजुन काही प्रमाणात भीती आहे त्यातच आता कोरोनाच्या नव्या वेरिएंट च्या चर्चेमुळे ती भीती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुन्हा शाळेची घंटा वाजणार की पुन्हा ब्रेक लागणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 

Scroll to Top