Why is it important for parents and children to communicate and coordinate after exam results?
आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांचा मुलांशी संवाद फार कमी झाला आहे. मुलांचे जे वय उमलण्याचे असते त्या वयात जर मुलांना पालकांचा पुरेसा वेळ मिळाला नाही तर मुले एकटी पडतात आणि परिणामी ती अबोल होतात . पालकत्व म्हणजेच पालकांनी मुलांशी संवाद साधने .
आज १२ वी चा निकाल लागला . काही मुलांना कमी तर काहींना जास्त गुण मिळाले असतील . काही पालक व पर्यायाने त्यांची मुले रिझल्टबाबत समाधानी नसतील , रिझल्टनंतरही त्यांच्या घरामध्ये तणावाचे किंवा धीरगंभीर वातावरण असेल .पण घरातील या वातावरणामुळे मुलांच्या मनावर कोणते परिणाम होत असतील याची तुम्ही कल्पना केली आहे का ?
अश्या वेळी मुलांना गरज असते पालकांच्या प्रोत्सहनाची, सकारत्मक विचारांची .आपले मूल युनिक म्हणजेच एकमेवद्वितीय आहे, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे . त्यामुळे इतरांशी त्याची तुलना करणे टाळावे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यासाठी तुम्ही त्याचे मित्र व मेंटॉर किंवा मार्गदर्शक बनणे अपेक्षित आहे. आपण मुलाचे पालक आहोत मालक नाही, याचे भान ठेवावे.स्वतःला उत्तम मार्क पाडून सिद्ध करण्याचे दडपण मुलांवर नकळत येतअसते . त्यामुळे मुलांशी योग्य पद्धतीने संवाद साधणे व त्यांना समजून घेणे, ही खरे तर जबाबदारी पालकांचीच आहे, असे मला वाटते.
परीक्षेत मिळालेले यश ,अपयश किंवा जरी कमी मार्क मिळाले असतील तरी, हे नॉर्मल मानले पाहिजे. पुढे आयुष्यात मुलांना चुका सुधारून आपली प्रगती करण्याची संधी आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तशी सकारात्मक ऊर्जा व प्रोत्साहन मुलांना दिले गेले पाहिजे. त्यासाठी आधी आपली मनोधारणा, आपले विचार तपासून पाहिले पाहिजेत.
काही मुले थेरॉटिकली थोडी कच्ची असतात. परंतु त्यांच्यामध्ये काही अंगभूत कौशल्ये असतात. काही मुलांमध्ये कलागुण, नेतृत्वगुण, खेळाडू बनण्याची क्षमता, अशी अनेक गुणवैशिष्ट्ये असतात. अशा मुलांना पारंपरिक शिक्षण न देता त्यांच्यातील नैसर्गिक गुणवत्तेचा विकास करण्यावर पालकांनी भर द्यायला हवा. दहावी अथवा बारावीमध्ये ९० टक्के मार्क मिळवलेला विद्यार्थी व ७० टक्के मिळवून खेळामध्ये राज्य स्तरावर पदक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याची हुशारी समान मानली पाहिजे. दोघांनाही तितकाच सन्मान दिला पाहिजे.
Ekdam barobar