Goddess Brahmacharini
चातुर्मासात येणाऱ्या अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसांच्या कालखंडात आदिमायेच्या विविध नऊ स्वरुपांचे पूजन, नामस्मरण, उपासना, जप, भजन, कीर्तन केले जाते. अगदी प्राचीन काळापासून नवरात्रोत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू आहे. सन २०२२ मध्ये २६ सप्टेंबर ते ०४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. नवरात्रात संपूर्ण देशभरात आपापल्या पद्धतीप्रमाणे विशेष व्रतपूजन केले जाते. मंगळवार, २७ सप्टेंबर २०२२ रोजी नवरात्राची दुसरी माळ असून, दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गेचे दुसरे रूप असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी मातेच्या स्वरूपाविषयी सांगायचे तर शास्त्रानुसार माता ब्रह्मचारिणी शुभ्र वस्त्रे परिधान करून उजव्या हातात अष्टदल आणि डाव्या हातात कमंडल घेतलेली असते.पौराणिक कथेनुसार, ब्रह्मचारिणीने भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, त्यामुळे मातेला तपस्चारिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाते. ब्रह्मचारिणी मातेची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात असे पुराणात सांगितले आहे.
ब्रह्मचारिणी मातेची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. ब्रह्मचारिणी मातेच्या स्वरूपाविषयी सांगायचे तर शास्त्रानुसार माता ब्रह्मचारिणी शुभ्र वस्त्रे परिधान करून उजव्या हातात अष्टदल आणि डाव्या हातात कमंडल घेतलेली असते. ब्रह्मचारिणी मातेची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात असे पुराणात सांगितले आहे.
ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने अनंत फळांची प्राप्ती होते आणि तप, त्याग, वैराग्य, सद्गुण, संयम यांसारख्या सद्गुणांमध्ये वाढ होते.जीवनातील कठीण संघर्षातही माणूस आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही. ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या कार्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते. वासनेपासून मुक्तीसाठी ब्रह्मचारिणी मातेचे ध्यान करण्याचा सल्ला शास्त्रात दिला आहे.
ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न-पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले. सर्व देवतांनी आणि ऋषी, मुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धता आणि धर्म प्राप्त होते. विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य दाखवला, तरी देवी प्रसन्न होते, असे म्हटले जाते. एकाग्रचित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात, असे सांगितले जाते.
Thank you.