How to increase the intelligence of children?
सर्व मुलांना कान, डोळे एकसारखे असले, तरी प्रत्येकाची आकलन शक्ती वेगळी असते. मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांच्या बौद्धिक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास होणे महत्त्वाचे असते. प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं आपली मुलं हुशार आणि बुद्धिमान व्हावी असं वाटतं. मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मुलांना चांगला आहार आणि योग्य संस्कार करण्याची गरज आहे. बदाम, अक्रोड, च्यवनप्राश खाण्यामुळे बुद्धि तल्लख होते. पण मुलं हुशार असणं आणि त्यांचा बुद्धांक जास्त असणं या दोन वेगवगेळ्या गोष्टी आहेत. मुलांच्या बुद्धांकामुळे त्यांचे वेगळेपण दिसून येते.
मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढते, या प्रकरणात आत्मविश्वास जागृत करण्यासाठीचे प्रयत्न, मुलांच्या मेंदूचा पूर्ण विकास, मुलांमधील शक्तीला दिशा देण्याची गरज, हायपर मुलांमधील उर्जेचे नियोजन, प्रश्नांमधून बुद्धीचा विकास, वैचारिक, भावनिक विकास, सामाजिक भान, मुलांचा स्वभाव कसा ओळखावा, स्मरणशक्ती विकासाची कला, सेल्फ स्टडीचे तंत्र, आदी पद्धतींतून मुलांचा विकास साधता येतो.
मुलांना एखादं वाद्य वाजवण्यास शिकवा :
मुलांच्या बौद्धिक विकास होण्यासाठी संगीत ही एक बेस्ट थेरपी ठरू शकते. या थेरपीमुळे मुलांचा आय क्यु लेव्हल तर वाढतेच शिवाय त्यांची एकाग्रता वाढते. यासाठीच मुलांना तबला, गिटार, हार्मोनियम, सितार, व्हायोलिन असं एखादं वाद्य शिकवा. ज्यामुळे मुलांचे मन एकाग्र होण्यास मदत होईल.
मुलांना खेळात तरबेज करा :
खेळ खेळण्यामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. यासाठी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ खेळणे महत्वाचं ठरतं. खेळता खेळता मुलं अनेक गोष्टी शिकतात, नवनवीन कौशल्यं त्यांच्यामध्ये विकसित होतात. उत्साह वाढण्यासाठी आणि बुद्धिमत्ता वाढण्यासाठी खेळ खेळणं फायद्याचं ठरेल.
मुलांना श्वासाचे व्यायाम शिकवा :
श्वासाचे व्यायाम मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. दीर्घ श्वासाचा व्यायाम केल्यामुळे मनात सकारात्मक विचार येण्यास मदत होते. मुलांना श्वासावर लक्ष ठेवण्यास शिकवलं तर विचारांवर लक्ष ठेवण्यास मदत होते. यासाठी मुलांना नियमित श्वासाचे व्यायामाचा सराव करण्यास शिकवा.
गणिते सोडवण्यास द्या :
गणिते सोडवण्यासाठी मुलांच्या बुद्धिचा कस लागतो. म्हणूनच मुलांना पाढे शिकवणे, दहा ते पंधरा मिनीटे एखादं कठीण गणित सोडवण्यास देणे फायद्याचे ठरेल. ज्याचा चांगला परिणाम नक्कीच तिच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होतो.
मनावर नियंत्रण मिळवण्यास शिकवा :
मनावर नियंत्रण असेल तर मुलांना एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यासाठी मुलांना मनावर नियंत्रण ठेवणारे माईंड गेम्स खेळण्यास शिकवा. मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी या स्कीलचा चांगला परिणाम होऊ शकतो.
Nice information but you have to attach a practical example with this.I am a pre primary Teacher so, I love this information.
Thank you