S R Dalvi (I) Foundation

शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते घट्ट आणि खास बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Topic: How to make a strong relationship between teacher and student  


शाळेत आपल्याला आवडणारे आणि न आवडणारे असे दोन्ही प्रकारचे शिक्षक असायचे. शाळेतील किंवा महाविद्यालयातील काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या नेहमी फेवरेट शिक्षकांच्या यादीत असतात. याचा अर्थ असा नाही की बाकीचे शिक्षक चांगले शिकवत नाहीत किंवा विद्यार्थ्यांशी वाईट वागतात. पण  त्या शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये खास कनेक्शन असते. शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे अशा खास नात्यांपैकी एक नातं आहे, जे आपण आयुष्यभर विसरु शकत नाही. विद्यार्थी आपल्या घरापेक्षा ही जास्त वेळ शाळेत घालवत असतो. शिक्षक किंवा शिक्षिका त्याला भविष्यातील वादळात उभे राहण्याचे बळ देतात.
तुमच्या आयुष्यातही असाच एक शिक्षक असेल ज्याला तुम्ही शाळा सोडल्यानंतरही तुमच्या आठवणींमध्ये जपून ठेवता, प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या शाळेशी आणि त्याच्या खास शिक्षकाशी वेगळे नाते असते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील ते खास नाते आणखी घट्ट करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगत आहोत.


मुलांना नावाने ओळखा

जर तुम्ही शिक्षक असाल आणि तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांसोबतचे नाते घट्ट करायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांची नावे लक्षात ठेवा, कारण यामुळे तुम्हाला एका वेळी एका विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करता येईल. आणि तुम्ही विद्यार्थ्याला त्याच्या नावाने ओळखता आवडेल.


चुकी झाली तर प्रेमाने समजावून सांगा

शालेय शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये ते अगणित चुका करतात तसेच अशा गोष्टी शिकतात, ज्याचा आपल्याला सदैव उपयोग होईल. म्हणूनच शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांनी चूक केल्यावर त्यांच्यावर न रागवता त्यांना समजावून सांगणे आणि त्या चुकीचे दुष्परिणाम देखील त्यांना सांगणे जेणेकरुन त्यांनी ती पुन्हा करणे टाळावे.


विद्यार्थ्यांशी मैत्री करा

जर तुम्हाला चांगले शिक्षक बनायचे असेल आणि मुलांच्या हृदयात स्थान निर्माण करायचे असेल, तर त्यासाठी आधी त्यांच्याशी मैत्री करा, जेणेकरून ते बिनदिक्कत आणि न घाबरता त्यांच्या समस्या शेअर करू शकतील. तुमच्या अशा वागण्यामुळे विद्यार्थी त्यांच्या वैयक्तिक समस्याही अनेक वेळा तुमच्याशी शेअर करू शकतात, ज्या ते त्यांच्या पालकांनाही सांगू शकत नाहीत.


टॅलेंट ओळखा

एक चांगला शिक्षक तो असतो जो आपल्या विद्यार्थ्यांमधील लपलेल्या कलागुणांना ओळखतो आणि त्याला सुधारण्यासाठी मदत करतो, त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या विद्यार्थ्यांमधील अभिनय, गायन, नृत्य, खेळ यासारख्या लपलेल्या कलागुणांचा शोध घ्यावा आणि त्यांना त्यामध्ये रस घेण्यास मदत करा. त्यांची कला शाळा, फंक्शनमध्ये दाखवण्याची संधी द्या.

Scroll to Top