S R Dalvi (I) Foundation

‘स्वच्छता मॉनिटर’ उपक्रम

‘Let’s Change’ Project

प्रोजेक्ट “Let’s Change” अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यात बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर अशी जबाबदारी स्वीकारण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम राबवण्याबाबत प्रस्ताव सादर केलेला आहे.

उपरोक्त प्रोजेक्ट अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम मुख्यता इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना केंद्रित करून राबविण्यात येणार आहे. या अन्वये राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची आवश्यकता निर्माण करून परिसरात स्वच्छता टिकून राहावी यासाठी विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करणे अशी योजना आहे.

त्याअनुषंगाने संक्षिप्त योजना खालीलप्रमाणे आहे.

· २०२० पासून अनेक शाळा ऑनलाईन संप्रेषण पध्दतीद्वारे विद्यार्थ्यांशी जोडल्या गेल्या आहेत. शाळेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ लिंक शेअर करावी, जी विद्यार्थ्यांनी ०२ ऑक्टोबर (रविवार) रोजी पहावी.

· “स्वच्छता मॉनिटर” म्हणून जबाबदारी स्वीकारणे या कल्पनेचा परिचय मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे करण्यात येईल.

· संदेशानंतर याच लिंकवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ७५ मिनिटांचा स्वयंस्पष्टीकरणात्मक मजेदार चित्रपट “Let’s Change” प्रसारित केला जाईल.

· सदर उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी “Let’s Change” या चित्रपटानंतर लोकप्रिय व्यक्तींच्या व्हिडिओ संदेशातून विद्यार्थ्यांसाठी कृती योजनेच्या आली आहे.

· ०३ ऑक्टोबर रोजी कृती आराखड्याबद्दल शंकांचे स्पष्टीकरण देण्यासाठी वर्ग शिक्षक यांनी संवाद सत्राचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसण करावे व उपक्रमाच्या अंमलबजावणी विषयी माहिती द्यावी.

· उत्तम कामगिरी करणाऱ्या “स्वच्छता मॉनिटर” यांचा जाहीर सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन द्यावे. असे कार्यक्रम आयोजित केल्याने “स्वच्छता मॉनिटर” ची जबाबदारी सातत्याने निभावण्याची उत्सुकता बळकट होऊन विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची जाणीव निर्माण होईल.

· विद्यार्थ्यांना “स्वच्छता मॉनिटर” बनवणे सर्वात योग्य आहे कारण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण होणार व या वयोगटातील विद्यार्थ्यांकडून झालेल्या मनाईबद्दल किंवा व्यक्तीचा निष्काळजीपणा निदर्शनास आणून दिल्यास नागरिकांमध्ये या उपक्रमाचा प्रसार अधिक होईल, यामुळे परिसर स्वच्छ राहील आणि सफाई कर्मचाऱ्यांवरचा भार कमी होईल.

· विद्यार्थ्यांनी वेळोवेळी व्यक्तीचा निष्काळजीपणा निदर्शनास आणून दिल्यावर त्यांच्या असामाजिक वागणूकीवर आळा बसेल.

या उपक्रमांतर्गत प्रसिद्धी, नियोजन व समन्वयासाठी लागणारा वित्त विषयक खर्च CSR उपक्रमांतर्गत जाहिराती आणि प्रायोजकांद्वारे पुर्ण करण्यात येणार असून शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नाही. या अटीच्या अधिन राहून सदर उपक्रम राबविण्यास परवानगी देण्यात येत आहे.

1 thought on “‘स्वच्छता मॉनिटर’ उपक्रम”

Comments are closed.

Scroll to Top