S R Dalvi (I) Foundation

शिक्षक – तुम्ही केवळ शिकवत नाही, तर तुमच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेलाही तुम्ही जबाबदार असता

लहान, किशोरवयीन मुलांच्या मनातील जाणून घेणे हे खरच खुप कठीण असे काम आहे. त्यांच्या बरोबर वागताना बोलताना आपल्याला त्यांच्या वयाचे होणे जमायला हव. कोरोना काळात जसे मोठ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल चर्चा होतेय तसंच आपण लहान मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलणे पण जरूरी आहे. या आधीच्या लेखात आपण पालकांनी त्यांच्या पाल्याचे मूड कसे सांभाळावे या बद्दल चर्चा केली. आज आपण शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते यावर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी आपल्या घरापेक्षा ही जास्त वेळ शाळेत घालवत असतात. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी बराच वेळ एकत्र असतात.लहान, किशोरवयीन मुलांमध्ये हल्ली डिप्रेशन,सतत चिडचिड, दुःखी राहणे, कुणाशीही बोलण्याची ईच्छा न होणे अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळत आहे. एक उदाहरण पाहूयात, राजेश नावाचा साधारण इयत्ता 8 मध्ये शिकणारा मुलगा. अभ्यासात हुशार, खेळातही चतुर ,शाळेतील प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिक मिळवणारा. इयत्ता सहावी पर्यंत राजेशने पहिला नंबर चुकवला नाही. मात्र ६ वी नंतर महित नाही का राजेश अभ्यासात मागे पडू लागला. वर्गात ही कोणाशी जास्त बोलेनासा झाला. नंतर त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेण्यासही सुरुवात केली. राजेश चे आईवडील दोघे ही कामनिमित्त सतत बाहेर असल्याने त्यांच्या ही गोष्ट तितकिशी लक्षात आली नाही मात्र त्याच्या शिक्षकांना त्याचे हे वागणे लक्षात आले आणि त्यांनी त्याच्या आईवडिलांना याबाबत माहिती दिली.अखेर त्याच्या आईवडिलांना शिक्षकांच्या मदतीने त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावे लागले. आणि त्या नंतर अनेक महीने राजेश ची मानसोपचार तज्ञांकडे ट्रीटमेंट सुरु होती.  सध्याच्या स्पर्धात्मक युगात अनेक छोट्या मोठ्या कारणांनी असे अनेक राजेश आता तयार होत आहेत. जस मी आधीच म्हटले की मुले त्यांचा जास्तीत जास्त वेळ शाळेत शिक्षकांच्या सनिध्यात घालवत असतात. आज आपण पाहूयात शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी वागताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे  कसे वागणे गरजेचे आहे.


तुमची भीती नाही तर आदर वाटू द्या 
शिक्षकाच्या मनात अहंगंड नसावा व विद्यार्थ्याच्या मनात न्यूनगंड नसावा. शिक्षकाच्या शारीरक हालचाली किंवा विचार, नजर, बोलणे या कशातूनच विद्यार्थ्यात भीती संक्रमित होता कामा नये. जर शिक्षकातील ही अहंगडाची भावना जर विद्यार्थ्यात उतरली तर विद्यार्थी त्याच्या भावी आयुष्यात एकतर प्रचंड उद्धट होऊ शकतो किंवा गुलाम मानसिकतेचा होऊ शकतो. शिक्षकाच्या वागणूकीचे नातेसंबंधातील चुकीच्या दृष्टीकोनाचे इतके गंभीर परिणाम होऊ शकतात. 


तुलना करू नका 
अनेकदा नकळत आपण ‘त्याने बघ किती छान मार्क्स मिळवले, तू  कसा पाठी रहिलास?’ किंवा जरा त्याच्याकडे बघून शिक नाहीतर कधीच पुढे जाणार नाहीस’ अशी वाक्य विद्यार्थ्यांना सगळ्यांसमोर ऐकवतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे अशाने विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तो मनाने पूर्ण खचून ही जाऊ शकतो.


कौतुक करायला शिका 
बऱ्याचदा एखादा विद्यार्थी अभ्यासात जेमतेम असेल मात्र इतर एक्टिविटीमध्ये  तो इतरांपेक्षा ही अव्वल असू शकतो तेव्हा त्याचे कौतुक करणे गरजेचे आहे. कौतुकाने विद्यार्थ्यांना आणखी चांगले करण्याचे प्रोस्ताहन मिळते.     


मनमोकळे बोला
दोन मित्र ज्याप्रमाणे एकमेकांशी बोलतात अगदी तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते असले पाहिजे. कोणतीही भावनात्मकता न आणता नम्रतेने शिक्षकाने मुलांशी बोलले पाहिजे. त्यांच्या संभाषणात फक्त प्रामाणिकता असावी आणि नम्रता असावी.

शाळेत एखादे काउंसिलिंग सेक्शन/ मदत कक्ष तयार करा 

बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनात अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवरून गोंधळ उडालेला असतो. अशा वेळी त्यांना कोणाशी बोलावे हे ही समजत नाही.  वर्गात इतर विद्यार्थ्यांसमोर बोलणे त्यांना लाजिरवाणे वाटते शाळेत असे एखादे काउंसिलिंग किंवा मदत कक्ष असावे जिथे विद्यार्थी कोणतीही लाज न बाळगता मनमोकळे पणाने बोलू शकतात. 


वर्गातील वातावरण हसते- खेळते ठेवा 

वर्गातील वातावरण नेहमी हसते-खेळते ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा वातावरणात विद्यार्थी नेहमी आनंदी राहतात ज्यामुळे विद्यार्थी  आणि शिक्षकांमध्ये चांगले नाते निर्माण होण्यास मदत ही मिळते.


एखाद्या विद्यार्थ्याचे वागणे अचानक बदलू लागले, संशयास्पद वाटू लागले आणि चिंतेचे वाटत असेल तर तात्काळ विद्यार्थ्यांच्या पालकांना याबद्दलची कल्पना द्यावी  सहाय्य करावे .   

Scroll to Top