S R Dalvi (I) Foundation

चांगले शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये नाते मजबूत होण्यासाठी असायला हव्यात ‘या’ गोष्टी

Topic: some tips for student teachers strong relationship

शिक्षकांच्या बाबतीत आपल्याला लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत वेगवेगळे अनुभव येत असतात . अनेक शिक्षकांना त्यांच्या कडक स्वाभवामुळे तुम्ही वाईट समजत असाल आणि अनेक शिक्षकांच्या प्रेमामुळे आणि ज्ञानामुळे तुम्हाला आजही त्यांची आठवण येत असेल. यावर विश्वास ठेवा किंवा नाही, शिक्षक खुप चांगले किंवा कठोरअसतात आणि ते तुमच्या जीवनात महत्त्वाचे योगदान देणारे व्यक्ती आहेत आणि नेहमीच असतील. आज आपण विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नात्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे त्यांचे नाते खूप खास बनते.


चांगले शिक्षक तुम्हाला चांगले विचार शिकवतात: तुमचा जन्म होताच तुमच्या मनात विचार करण्याची प्रक्रिया सुरू होते. कुटुंब, आई-वडील, भावंडं यांच्यात राहून तुम्हाला अनेक व्यावहारिक गोष्टींची माहिती मिळते, पण वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी तुमचे पालक तुम्हाला शाळेत पाठवतात. वर्गातील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, तुमचे शिक्षक तुम्हाला विविध क्रियाकलापांद्वारे विचार करायला शिकवतात. एक चांगला विद्यार्थी या नात्याने तुम्ही अभ्यासक्रमाव्यतिरिक्त तुमच्या आवडत्या शिक्षकाशीही बोलले पाहिजे. त्यांचे अनुभव जाणून घेतले पाहिजेत आणि अभ्यासादरम्यान येणाऱ्या व्यावहारिक समस्यांबद्दल बोलले पाहिजे.


चांगले शिक्षक तुमच्या क्षमता ओळखतात: चांगल्या शिक्षकाचा एक गुण म्हणजे ते तुमच्या क्षमता ओळखतात. मात्र, हा अनुभव शिक्षकांना दीर्घकाळात येतो. वर्गादरम्यान तुमच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवून, शिक्षक अनेकदा तुमचा स्वभाव आणि तुमचा मूड समजून घेऊ लागतात. यावरून तुमच्यासाठी कोणता विषय किंवा कोणते करिअर चांगले आहे, याची कल्पना शिक्षकांना मिळते.एक चांगला विद्यार्थी या नात्याने तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून चांगल्या करिअरसाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी आवश्यक टिप्स घ्याव्यात. साहजिकच शिक्षकाचा अनुभव तुमच्यापेक्षा जास्त असेल, त्यामुळे त्यांचे मत जाणून घेतले पाहिजे.


चांगले शिक्षक तुमची प्रतिभा वाढवतात: प्रत्येक मुलामध्ये काही ना काही नैसर्गिक प्रतिभा असते, जी कालांतराने विकसित होणे आवश्यक असते अन्यथा ही प्रतिभा कुंठित होते. चांगले शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना हे नैसर्गिक देतात. ते केवळ प्रतिभांना समजून घेण्यास मदत करत नाहीत तर त्यांना वाढवण्याची संधी देखील देतात. शाळेतील सर्व उपक्रमांतून हळूहळू शिक्षकांना मुलांमध्ये दडलेल्या कलागुणांना दाखवण्याची संधी दिली पाहिजे. एक चांगला विद्यार्थी या नात्याने हेही तुमचे कर्तव्य आहे की जेव्हा जेव्हा शिक्षक तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी देतात तेव्हा तुम्ही त्यांना निराश करू नका.


शिक्षक जबाबदारीने वागायला शिकवतात: चांगल्या शिक्षकाचा एक गुण म्हणजे तो तुम्हाला जबाबदार बनवतो. जेव्हा शिक्षक तुम्हाला गृहपाठ न केल्यामुळे थोडं ओरडतात तेव्हा तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या हळूहळू समजायला लागल्या पाहिजेत हे कारण असते. वयानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जबाबदाऱ्या बदलतात. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या समजून घेत आहात आणि त्यांच्यासाठी जबाबदार आहात हे शिक्षक तुम्हाला हळूहळू अंगवळणी पाडण्यास मदत करतील.चांगल्या विद्यार्थ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो त्याच्या जबाबदाऱ्या समजून घेतो आणि पूर्ण करतो. आपल्या निर्णयांच्या योग्य आणि चुकीसाठी जबाबदार असणे हे देखील जबाबदार व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

आणखी कोणत्या गोष्टी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते मजबूत करण्यासाठी असाव्यात असे तुम्हाला वाटते? ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून पाठवा.