S R Dalvi (I) Foundation

रामजी मालोजी सकपाळ कोण होते?

Who was Ramji Maloji Sakpal?

सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे डॉ भीमराव आंबेडकर यांचे वडील होते. ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवडे गावचे.

सुभेदार रामजी हे सैन्यात शिक्षक होते, जिथे त्यांनी चौदा वर्षे मुख्याध्यापक पद भूषवले आणि सुभेदार-मेजर ही पदे गाठली. इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजीरावांचे चौथे अपत्य होते. मालोजीरावांचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले. शिक्षण सुरु असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲंड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. त्यांची लष्करी तुकडी मध्य भारतात महू येथे तैनात असताना, रामजी आणि त्यांची पत्नी भीमाबाई यांना त्यांच्या चौदाव्या अपत्य डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांचा आशीर्वाद मिळाला.

रामजी १९ वर्षाचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते. रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते. ते रोज ज्ञानेश्वरी वाचत, सकाळी स्त्रोते व भुपाळ्याही म्हणत.

सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरु झाले व त्यांनी इंग्रजी उत्तमरित्या आत्मसात केली. मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुचली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नॉर्मल स्कूल’मध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या (मॅट्रिकच्या) परीक्षेत उत्तीर्ण झाले. रामजींना उत्तम शिक्षण बनवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यास पुण्याच्या सैनिक शाळेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राजसत्तेच्या सैनिक शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले व या पदावर ते चौदा वर्ष राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात ‘सुभेदार’ पदाचीही बढती मिळाली.

रामजी व भीमाबाई या दांपत्यांना सन १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा,मंजुळा व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम,आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता. रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती.

2 फेब्रुवारी 1913 रोजी रामजींचे मुंबईत निधन झाले. डॉ. आंबेडकरांना त्यांचे वडील प्रेमाने भीम म्हणत.

Scroll to Top