S R Dalvi (I) Foundation

Home Events Utkarsh Shikshak Award 2022 – District Level

Utkarsh Shikshak Award 2022 – District Level

SRD (I) फाउंडेशन, एक गैर-नफा संस्था, श्रीमती सीता दळवी यांनी स्थापन केली आहे. सीता रामचंद्र दळवी आणि त्यांचे पती रामचंद्र ६   दळवी यांनी आमच्या निर्मितीच्या वर्षांमध्ये आणि नंतरही महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी कृतज्ञता म्हणून ही फाउंडेशन तयार करण्यात आली आहे.

२०२१ मध्ये आमच्या फाउंडेशन ने कोव्हीड च्या काळात ज्या शिक्षकांनी मोलाची कामगिरी केली होती अशा 12 शिक्षकांचा महाशिक्षक पुरस्कार २०२१ देऊन सन्मान केला होता. हा पुरस्कार देण्यासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची उपस्थिती लाभली होती.

आता साल २०२२ साठी शिक्षकांचा सन्मान, कौतुक आणि समाजप्रति ते करत असलेल्या कामगिरीसाठी उत्कर्ष पुरस्कार २०२२घेऊन येत आहोत.

पुरस्कार देण्याचे कारण   

आजचे विद्यार्थी हे उद्याचा समाज घडवणार आहेत आणि विद्यार्थ्यांना घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकावर असते. विद्यार्थ्यांना उद्याचे सुजाण नागरिक बनवण्यासाठी शिक्षक  जे काही करतात त्याची परत फेड आपण कधीच करू शकत नाही मात्र फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांचा सन्मान आणि कौतुक नक्कीच करू शकतो. या पुरस्काराचा मुख्य उद्देश्य शिक्षकांचा सन्मान करणे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उत्कृष्ट शिक्षक शोधणे हा आहे.  

नियम अटी 

– शिक्षकांनी लिहिलेला निबंध एकदाच पोस्ट करावा 

– लिहिलेला निबंध कोणत्याही साइट अथवा लेखातून कॉपी केलेला नसावा 

– सहभाग घेतलेले शिक्षक हे सांगितलेल्या पात्रतेत बसणारे असावेत 

– लिहिलेल्या निबंधात एखादा प्रसंग 

 

Scroll to Top